Pimpri Chinchwad : व्यायाम करताना कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू

Pimpri Chinchwad Latest Marathi : पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दलातील फायरमॅन राजेश राऊत यांचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे विभागात शोककळा पसरली आहे.
Heart Attack Treatment
Heart Attack Treatment
Published On

गोपाळ मोटगरे, पिंपरी चिंचवड

Pune, Pimpri Chinchwad Latest Marathi News : जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अग्निशमन दलातील फायर मॅनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. राजेश रामभाऊ राऊत असे जवानाचे नाव आहे. तो नियमित व्यायाम करण्यासाठी जिमममध्ये येत होता. पण मंगळवारी त्याला हार्टअटॅक आला अन् जागेवरच मृत्यू झाला. व्यायाम करताना त्याला अस्वस्थ वाटू लागले अन् कोसळला. त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी मृत असल्याचे सांगितले.

जिम मध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अग्निशमन दलातील फायरमॅन जवानाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी येथील अग्निशमन दल केंद्रात हे दुर्दैवी घटना घडली आहे. राजेश रामभाऊ राऊत वय 31 वर्ष असं मृत्यू झालेल्या फायरमॅन जवानाचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार राजेश राऊत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला,असावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशमन दलावर शोककळा पसरली आहेत

Heart Attack Treatment
Local Body Election : धुरळा उडणार, तयारीला लागा! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट...

राजेश राऊत मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे अग्निशमन केंद्रातील जिम मध्ये व्यायाम करत होते. व्यायामादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने, थोडा वेळ आराम करतो असं सांगून ते खाली आले. त्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या सहकाऱ्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारा पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

Heart Attack Treatment
Nashik Accident: साई भक्तांवर काळाचा घाला, शिर्डीला जाताना कारचा चक्काचूर, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com