Sunita Ahuja: 'गोविंदा त्याच्या सर्व हिरोईनसोबत फ्लर्ट...'; सोनाली बेंद्रेच्या शोमध्ये पत्नी सुनीताने केला धक्कादायक खुलासा

Sunita Ahuja On Govinda Secret: गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने आता 'पती पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमध्ये गोविंदाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की तो सर्व हिरोईनसोबत फ्लर्ट करायचा.
Sunita Ahuja On Govinda Secret
Sunita Ahuja On Govinda SecretSaam Tv
Published On

Sunita Ahuja On Govinda Secret: काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या अफवांनी बरीच चर्चा रंगवली होती. मात्र, नंतर दोघेही एकत्र आले आणि त्यांनी या अफवांना पूर्णपणे खोडून काढले. आता सुनीता सोनाली बेंद्रे आणि मुनावर फारुकी यांच्या 'पती पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. येथे तिने गोविंदाबद्दल अनेक खुलासे केले. सुनीता म्हणाली की गोविंदा त्याच्या काळातील प्रत्येक हिरोईनसोबत फ्लर्ट करायचा.

गोविंदा सोनाली बेंद्रेसोबत फ्लर्ट करत नव्हता

'पती पत्नी और पंगा'च्या आगामी भागात सुनीता आहुजा पाहुणी म्हणून दिसणार आहे. यादरम्यान, तिने गोविंदाबद्दलचे अनेक किस्से सांगितले. आता अलिकडच्या प्रोमोमध्ये सुनीता म्हणाली की गोविंदा त्याच्या काळातील प्रत्येक हिरोईनसोबत फ्लर्ट करायचा. सुनीता म्हणाली की सोनाली बेंद्रे ही एकमेव अभिनेत्री होती जिच्यासोबत गोविंदाने कधीही फ्लर्ट केले नाही. हे ऐकून सेटवर उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण सोनाली बेंद्रेने गोविंदासोबत तिच्या कारकिर्दीतील पहिला मोठा हिट 'आग' चित्रपट केला होता.

Sunita Ahuja On Govinda Secret
karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

याशिवाय, एका प्रसंगी सुनीता म्हणते की तुम्ही या शोचे नाव 'पती पत्नी और पंगा' फक्त माझ्या आणि गोविंदावर ठेवले आहे का? यानंतर सर्वजण जोरात हसायला लागतात. या दरम्यान, सर्वांनी गोविंदाच्या 'मैं तो रास्ते से जा रहा था' या गाण्यावर डान्स देखील केला.

Sunita Ahuja On Govinda Secret
Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

पती पत्नी और पंगा

'पती पत्नी और पंगा' हा एक रिअॅलिटी शो आहे. मुन्नवर फारुकी आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे शो होस्ट करत आहेत. या शोमध्ये पती-पत्नीचा रिअ‍ॅलिटी चेक आहे. शोमधील पती-पत्नी कपलमध्ये रुबिना दिलाइक आणि अभिनव शुक्ला, हिना खान आणि रॉकी जयस्वाल, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद, गीता फोगट आणि पवन कुमार, गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी, सुदेश लाहिरी आणि ममता लाहिरी, अविका गौर आणि मिलिंद चांदवानी आणि ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. हा शो शनिवार-रविवार रात्री ९ वाजता कलर्स आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com