
लहान मुलांना चक्कर येत असेल तर यामागे मोठी कारणे असू शकतात. सहसा लहान मुलांना चक्कर येत नाही. तर चक्कर येण्याचे कारण म्हणजे, अशक्यपणा, थकवा किंवा एखादा आजार. कधी कधी जास्तवेळ उन्हात थांबल्यामुळे चक्कर येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही लगेचच पाणी पिऊन किंवा साखर खाऊन काहीवेळात व्यवस्थित होऊ शकता. पण लहान मुलांना चक्कर आल्यावर काय केलं पाहिजे? हे पुढील माहितीत आपण जाणून घेणार आहोत.
लहान मुले मोठ्यांच्या तुलनेत थोडे अशक्त असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये चक्कर येण्याचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांना चक्कर येत असेल तर त्यांना आरामाची खूप गरज असते. पालकांनी मुलांना लगेचच डोळे बंद करुन झोपायला सांगितले पाहिजे. तासाभराने मुलांचा ब्लड फ्लो सामान्य होतो आणि चक्कर थांबते.
पाण्याचे प्रमाण
पालकांनी मुलांना नेहमी पाणी जास्त दिले पाहिजे. लहान मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्तच असले पाहिजे. त्याचे प्रमाण कमी झाल्याने मुलांना चक्कर येण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ही समस्या शरीर डिहायड्रेट झाल्यावर सुरु होते. जर लहान मुलं पाणी पिणं टाळत असतील तर त्यांना फळांचा रस देणे नेहमीच योग्य पर्याय ठरेल.
डोकं थंड करा
लहान मुलांना चक्कर का आली हे शोधून त्यावर उपचार करा. म्हणजेच जर मुलांना उन्हात उभं राहील्यामुळे चक्कर आली असेल तर त्यांचं डोकं थंड पाण्याने शेकवा. तुम्ही यासाठी आइस पॅकचा वापर करु शकता. त्याने तुम्हाला लगेचच शरीर शांत झालेलं वाटेल.
लहान मुलांना पडण्यापासून वाचवा
लहान मुलांना चक्कर येण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते पडणे. लहान मुलांना जर गंभीर जखम झाली असेल तर त्यांना चक्कर येऊ शकते. काही वेळेस पडल्यावर त्यांचं रक्त वाहत असल्यामुळे सुद्धा चक्कर येऊ शकते. त्यावेळेस पालकांना मुलांना एका कडेला बसवून झोपवलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.