Sakshi Sunil Jadhav
काही महिलांचे केस हे महिनोंमहीने वाढत नाहीत. ही महिलांसाठी गंभीर बाब असू शकते.
तुम्ही अशावेळेस महागड्या कॅमिकलयुक्त शॅम्पूचा वापर करणे हे अत्यंत रिस्की ठरू शकतं.
तुमच्यासाठी पुढे केस वाढवण्याचे सिक्रेट दिले आहे. त्यासाठी तुम्हाला अळशीच्या बिया दिसायला लहान असल्यातरी यात बरेच गुणधर्म असतात.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि फायबर्स असतात. जे मोठ्या प्रमाणात असतात.
तुम्ही केसांच्या हेअर मास्कसाठी अळशीच्या बिया पाण्यात ३ ते ४ तास भिजत ठेवा.
पुढे बियांची बारिक पेस्ट करुन केसांना लावा.
तुमचे केस कोरडे, आणि पांढरे होत असतील तर हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरेल.
आता तुम्ही केस १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्यावेत.
तुम्हाला चमकदार आणि सॉफ्ट केस जाणवतील. तसेच ही पेस्ट केसांना लावून मसाज केल्याने तुमचे केस काहीच दिवसात वाढतील.
NEXT: कांदा-लसूण सोडल्यावर शरीरात होतात हे ७ बदल, जाणून व्हाल थक्क