Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांना झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश

MLA Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय गायकवाड अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत.
Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांना झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश
MLA Sanjay GaikwadSaam Tv
Published On: 
  • संजय गायकवाड यांच्याविरोधात कारवाई होणार

  • संजय गायकवाड यांचे निलंबन होणार

  • एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे दिले आदेश

  • शेतकऱ्यांवरील वक्तव्यामुळे संजय गायकवाड अडचणीत

शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले आहेत. या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांच्या निलंबनाचा आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात शिवसेना शिंदेसेने मदतीला धावून जाते. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदेसेनेने व्यापक मदत मोहीम सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली दिल्या जात आहेत. दसरा मेळाव्यात १०० ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात शिंदेसेनेकडून पाठवले आहेत. गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य पाठवण्यात आले.

Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांना झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश
Maharashtra Politics: ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदेसेनेत गेलेल्या ६ नेत्यांची खासदारकी जाणार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टात लागणार निकाल

शिंदेंची शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करत असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांना झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश
Maharashtra Politics: ४ आमदारांचा एकच राजन मामा, राज्यभरात तुफान चर्चा; आहेत तरी कोण?

शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी नुकताच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मैतीला कुणी जाऊ नये, असे विधान त्यांनी केले होते. ते म्हणाले होते की, 'शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदार यांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्वजण मिळून त्याची मदत करू. पण शेतकरी कुठल्याही विचार न करता आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांच्या मौतीला कुणी जाऊ नये.'

Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांना झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश
BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.