Maharashtra Politics: ४ आमदारांचा एकच राजन मामा, राज्यभरात तुफान चर्चा; आहेत तरी कोण?

Solapur Ex MLA Rajan Patil: छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील विजयी झाल्यानंतर सोलापूरातील राजनमामांची चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra Politics: ४ आमदारांचा एकच राजन मामा, राज्यभरात तुफान चर्चा; आहेत तरी कोण?
Solapur Ex MLA Rajan PatilSaam Tv
Published On: 
  • महाराष्ट्राच्या राजकारणातील राजन मामाची चर्चा

  • राजन पाटील हे चार आमदारांचे मामा

  • प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर राजन मामांची राज्यभर चर्चा

माधव सावरगावे, संभाजीनगर

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडली. त्याचवेळी भाजप आणि शिंदेसेनेत 'शकुली मामा'कोण असा प्रश्न विचारला गेला. त्याचवेळी दुसऱ्या मामाची राज्यभरात चर्चा होत आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील विजयी झाल्यानंतर सोलापूरच्या मामाची चर्चा सुरु आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील विजयी झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या कुटुंबातील राजकीय समीकरणांची देखील मोठी चर्चा होत आहे. दरम्यान, आता प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर माजी आमदार पाटील यांची चर्चा होत आहे.

प्रतापसिंह पाटील विजयी झाल्यानंतर राजन पाटलांचे एकूण तीन भाचे आमदार म्हणून विधीमंडळात असतील. परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल वेदप्रकाश पाटील हे माजी आमदार राजन पाटील यांची बहीण शांतादेवी यांचे पुत्र आहेत. शांतादेवी यांचा दुसरा मुलगा आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेत. माजी आमदार राजन पाटील यांच्या थोरल्या भगिनी शारदादेवी यांची दोन्ही मुलं देखील आमदार आहेत.

Maharashtra Politics: ४ आमदारांचा एकच राजन मामा, राज्यभरात तुफान चर्चा; आहेत तरी कोण?
MLC Result: विधानपरिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वादाची ठिणगी, भाजपने पराभवाचं खापर शिंदेसेनेवर फोडलं

बीडच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित आणि त्यांचे बंधू अमरसिंह पंडित हे सुद्धा गेवराईचे माजी आमदार आहेत. या व्यतिरिक्त राजन पाटील यांचे वडील स्वर्गीय बाबूराव पाटील हे देखील आमदार राहिलेत. स्वतः राजन पाटील हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून ३ वेळा आमदार राहिलेत. त्यांचे मेहुणे म्हणजेच शिवाजीराव पंडित हे सुद्धा आमदार आणि राज्यमंत्री होते.

Maharashtra Politics: ४ आमदारांचा एकच राजन मामा, राज्यभरात तुफान चर्चा; आहेत तरी कोण?
MLC Election Result: २८ जागांचा निकाल जाहीर! कुणाची बाजी अन् कुणाला धक्का? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला. शरद पवारांचे उमेदवार प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला. ते १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ८५ हजार ८७६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली.

Maharashtra Politics: ४ आमदारांचा एकच राजन मामा, राज्यभरात तुफान चर्चा; आहेत तरी कोण?
MLC Result: पराभवानंतर महायुतीतला तणाव वाढला, भाजपच्या गोटात हालचालींना वेग; आमदार-मंत्र्यांवर कारवाईच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com