BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

Prasad Lad Latest News : मनोज जरांगे पाटील यांच्या व्हिडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या वादात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे. या वादामुळे महायुतीतील राजकीय चर्चांना वेग आला आहे.
प्रसाद लाड
Prasad LadSaam Tv
Published On: 

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या व्हिडिओ क्लिपवरून निर्माण झालेल्या वादात आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गळा कापण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. मात्र, हे आरोप पूर्णपणे चुकीचे असून भाजपला आणि उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा लाड यांनी दिला. शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांनी व्हिडिओ क्लिप प्रसारित केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आणि आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, संबंधित क्लिप सायबर विभागाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मात्र, या प्रकरणावरून रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केल्याने लाड यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीमध्ये आपण एकत्र काम करत आहोत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व नेत्यांना आपण नेता मानतो. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांबाबत आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी समन्वयातून प्रश्न सोडवावेत, असे ते म्हणाले.

प्रसाद लाड
Pune : स्मिता जाधव की हर्षदा देशमुख, पुणे पदवीधरचा भावी आमदार कोण? Exit चा धक्कादायक अंदाज

‘जरांगे पाटील यांना भेटलो, तेव्हा कॅमेऱ्यासमोर भेटलो’

रामदास कदम यांनी दाखवलेल्या छायाचित्रावरही प्रसाद लाड यांनी आक्षेप घेतला. माझेही पाचशे फोटो माध्यमांकडे आहेत. मी पळकुटा नाही. मनोज जरांगे पाटील यांना भेटलो, तेव्हा माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर भेटलो. त्यांची गुप्तपणे किंवा वेगळी भेट घेतल्याचा पुरावा दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले.

आपण मराठा समाजाचे नेतृत्व मिळवण्यासाठी काम करत नसून, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत होतो, असेही लाड यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेले शासन निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

प्रसाद लाड
Exit Poll: संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, कोण होणार आमदार? एक्झिट पोलचा अंदाज आला समोर

मनोज जरांगे पाटील यांनी २०२३ आणि २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, त्या वेळी रामदास कदम कुठे होते, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनीही आपापली भूमिका मांडली होती. मात्र, आता भाजपला लक्ष्य करून महायुतीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याबाबत रामदास कदम यांनी पडद्यामागे केलेल्या वक्तव्यांच्या क्लिप आपल्याकडे आहेत, त्या आपण उघड करू, असा इशाराही लाड यांनी दिला. कोण काय बोलते, कोण कोणाला लक्ष्य करते, याची आम्हाला माहिती आहे. आम्ही बोलायला लागलो तर खूप काही बोलू शकतो, अशा शब्दांत त्यांनी कदम यांना सुनावले.

प्रसाद लाड
Exit Poll: पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज; कुणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ?

‘एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मोठे भाऊ’

एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना लाड म्हणाले की, शिंदे हे आमचे नेते, मोठे भाऊ आणि वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळे त्यांची भीती वाटते, असे म्हटले तर ती आदरातून वाटणारी भीती आहे. एकनाथ शिंदे यांना आपला नेता मानतो. त्यांना भाजपबाबत काही आक्षेप असता, तर त्यांनी स्वतः आपल्याशी चर्चा केली असती. त्यामुळे त्यांच्या नावाने आरोप करण्याऐवजी थेट संवाद साधावा, असे लाड म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले, तेव्हा रामदास कदम कुठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रामदास कदम यांनी अशा प्रकारची वक्तव्ये थांबवावीत. स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी भाजपला बदनाम करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रसाद लाड
BJP Leader Arrested : महाराष्ट्र हादरला! भाजप शहराध्यक्षला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

‘एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मोठे भाऊ’

एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना लाड म्हणाले की, शिंदे हे आमचे नेते, मोठे भाऊ आणि वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळे त्यांची भीती वाटते, असे म्हटले तर ती आदरातून वाटणारी भीती आहे. एकनाथ शिंदे यांना आपला नेता मानतो. त्यांना भाजपबाबत काही आक्षेप असता, तर त्यांनी स्वतः आपल्याशी चर्चा केली असती. त्यामुळे त्यांच्या नावाने आरोप करण्याऐवजी थेट संवाद साधावा, असे लाड म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले, तेव्हा रामदास कदम कुठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रामदास कदम यांनी अशा प्रकारची वक्तव्ये थांबवावीत. स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी भाजपला बदनाम करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी

शिवसेना आणि भाजपमध्ये चांगला समन्वय असून, महायुतीतील प्रश्न समन्वय समितीच्या माध्यमातून सोडवले जातात, असे लाड यांनी सांगितले. याप्रकरणी आपण उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदम यांच्या वक्तव्यांबाबत शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, अशी विनंती केल्याचे लाड यांनी नमूद केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये मतभेद निर्माण होऊ नयेत. मराठा समाजाच्या प्रश्नांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी समन्वयातून मार्ग काढण्याची गरज आहे. मात्र, भाजपला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले, तर ते सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com