Pune : स्मिता जाधव की हर्षदा देशमुख, पुणे पदवीधरचा भावी आमदार कोण? Exit चा धक्कादायक अंदाज

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये डॉ. स्मिता जाधव यांचे पारडे जड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांच्यात थेट लढत आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचे पारडे जड असल्याचं दिसत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचे पारडे जड असल्याचे समोर आले आहे. 'साम टीव्ही'च्या एक्झिट पोलनुसार, या निवडणुकीत भाजप बाजी मारण्याची शक्यता असून डॉ. स्मिता जाधव या संभाव्य आमदार ठरू शकतात.

पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल ३ लाख ८८ हजार मतदार आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने भाजपच्या डॉ. स्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून हर्षदा देशमुख जाधव, तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) सुनील मोदी रिंगणात होते. या दोन्ही प्रमुख महिला उमेदवार उच्चशिक्षित असल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली होती.

गेल्या काही दिवसांत भाजपची प्रचार रणनीती अत्यंत आक्रमक स्वरूपात पाहायला मिळाली. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे संघटन आणि 'मॅन टू मॅन नेटवर्क' प्रभावी ठरल्याचे दिसून आले. भाजपची हीच संघटनात्मक ताकद आणि निवडणुकीतील विजयी ट्रेण्ड डॉ. स्मिता जाधव यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com