Exit Poll: संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, कोण होणार आमदार? एक्झिट पोलचा अंदाज आला समोर

Sambhajinagar Graduates Exit Poll: छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, डॉ. प्रतापसिंह पाटील आणि दिलीप घुगे यांच्यात तिरंगी लढत झाली. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचे पारडे जड असल्याचे समोर आले आहे. 'साम टीव्ही'च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सतीश चव्हाण हे या निवडणुकीत संभाव्य आमदार ठरू शकतात.

प्रमुख उमेदवार आणि तिरंगी लढत:

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून डॉ. प्रतापसिंह पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कडून दिलीप घुगे यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. महाविकास आघाडीमध्येही या जागेवरून काही प्रमाणात अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली होती. तसेच, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी सतीश चव्हाण यांना उघडपणे विरोध दर्शवला होता.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मागील १८ वर्षांपासून सतीश चव्हाण प्रतिनिधित्व करत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असले, तरी गेल्या १८ वर्षांमधील त्यांची मजबूत पकड आणि पहिल्या पसंतीच्या मते मिळवून कोटा पूर्ण करण्याच्या शक्यतेमुळे ते विजयाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे विश्लेषणात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com