

भाजप-शिंदेसेना युतीवर प्रश्नचिन्ह
२०२९ निवडणुकीपूर्वी तणावाचे संकेत
जागावाटपावरून वाद वाढण्याची शक्यता
भाजप-शिंदेसेना युती तुटणार असल्याचे सं
महायुतीत सारं काही आलबेल असल्याची चर्चा असताना शिंदेसेनेच्या एका शिलेदारानं 2029 ला युती तुटणार असल्याचे संकेत दिलेत. भाजप- शिंदेसेना युती खरचं तुटणार का? मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रीया दिलीये? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात चांगली कामगिरी केली. शिंदेसेनेनंही आपली ताकद सिद्ध करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र आता चर्चा सुरु झालीय, 2029 च्या विधानसभा निवडणुकीची. शिंदेसेनेच्या शिलेदारानं 2029 च्या निवडणुकीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय. खर तर 1995 पासून असणारी शिवसेना-भाजप युती 2014 मध्ये जागावाटपावरून पहिल्यांदा तुटली होती.
त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी करून वेगळी वाट धरली. मात्र त्यानंतर झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी पुन्हा भाजपसोबत युती केली. पण आता 2029 मध्ये भाजप आणि शिंदेसेनेची ही युती टिकणार की फिस्कटणार? हाच प्रश्न निर्माण झालाय आणि त्याला कारण ठरलयं. शिरसाटांनी केलेलं एक विधान....
शिरसाटांच्या या विधानानंतर पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, असे सांगत उदय सामंतांनी महायुतीतील अंतर्गत वादाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला... मात्र, पडद्यामागे शिंदेसेना 2029 ची तयारी आत्तापासूनच सुरू केल्याचे संकेत मिळतायत. मात्र 2029 ला खरचं भाजप- शिंदेसेना स्वतंत्र निवडणुकीला समोरे जाऊ शकतात का? महायुतीतील या फुटीमागे नेमकी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतील? पाहूयात...
2024 च्या निवडणुकीत भाजपला 135, शिंदेसेनेला 57 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. त्यामुळे 2024 च्या निकालानुसार महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. अशावेळी 2029 च्या निवडणुकीत भाजप अधिक जागांवर दावा करणार हे निश्चित. अशावेळी शिंदेसेनेतील नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची शक्यता आहे. महायुतीतील मित्रपक्षांनी यासाठी आतापासूनच आपापली ताकद वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केलीय. एवढचं नाही तर पक्षवाढीचा विचार करूनच दोन्ही पक्षांनी विधानपरिषदेसाठी उमेदवार दिलेत.
दरम्यान 2029 ला जागावाटपात आपलं पारडं जड राहावं यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करणार हे जवळपास निश्चित आहे. अशात 2029 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून कॉल्डवॉर रंगणार की सामंजस्यानं वाद मिटवून मैत्री कायम ठेवली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.