Jay Pawar: २०२९ ला जय पवार दादांचे वारसदार? बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार; नेमकं काय म्हणाले?

Jay Pawar Statement On 2029 Election: जय पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असावं अशी लोकांची इच्छा आहे, असे जय पवार यांनी सांगितले.
Jay Pawar: २०२९ ला जय पवार दादांचे वारसदार? बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार; नेमकं काय म्हणाले?
Jay Pawar statement on VSR company ownerSaam Tv
Published On

Summary -

  • जय पवारांनी २०२९ विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं

  • बारामतीतून उमेदवारीबाबत लोकांची इच्छा असल्याचं सांगितलं

  • अजित पवारांचे वारसदार कोण? यावर चर्चा रंगली

  • जय पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं

२०२९ च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात जय पवारांनी मोठं विधान केलं. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असावं अशी लोकांची इच्छा आहे, असं विधान जय पवारांनी केलं. त्यामुळे २०२९ मध्ये जय पवार अजितदादांचे वारसदार असणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी हे मोठं विधान केले. जय पवार यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बारामतीची पोटनिवडणूक होत असतानाच बारामतीत दादांचे वारसदार कोण हा सवाल सर्वांच्याच मनात आहे. अशातच अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी केलेल्या विधानामुळे आता चर्चा होऊ लागली आहे. जय पवार यांनी सांगितले की, 'बारामती मधून २०२९ ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं. ही लोकांची इच्छा आहे. पण माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं.' त्यांच्या या विधानामुळे आता दादांचे वारसदार जय पवार होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Jay Pawar: २०२९ ला जय पवार दादांचे वारसदार? बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार; नेमकं काय म्हणाले?
Jay Pawar Education: जय पवारांची राजकारणात अधिकृत एन्ट्री; जाणून घ्या त्यांचं शिक्षण किती झालंय?

यावेळी जय पवारांनी अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सांगितले की, 'अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अहवाल यायला एक वर्ष लागणार आहे. त्याचा तपास लवकरात लवकर करावा त्याची मागणी आम्ही वेगळेवेगळे यंत्रणेकडे करत आहोत. सीआयडीची टीम देखील चांगलं काम करत आहे. आमचा त्यांच्याशी संपर्क आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे ते त्यात लक्ष घालतील.अपघातासंदर्भात जोपर्यंत खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत घातपात की अपघात हे स्पष्ट होणार नाही. मी लोकांची दिशाभूल करणार नाही. आपण तोपर्यंत थांबूया जोपर्यंत कारवाई होत नाही. सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत.'

Jay Pawar: २०२९ ला जय पवार दादांचे वारसदार? बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार; नेमकं काय म्हणाले?
Baramati Election: मतदान करताना सुनेत्रा पवार भावुक, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून मतदान करण्याचं आवाहन; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com