

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक
सुनेत्रा पवार यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला
मतदानानंतर त्या भावुक होत दादांना श्रद्धांजली म्हणून मतदान करण्याचे आवाहन केलं
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अतिशय भावनिक वातावरणात सुनेत्रा पवार यांनी कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. पार्थ पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, रेवती सुळे, श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी मतदान केले. अजित पवारांच्या आईंनी घरीच मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी या सर्वांनी बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.
आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनीही याच ठिकाणी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुनेत्रा पवार भावुक झाल्या. त्यांनी यावेळी सांगितले की, 'अत्यंत भावनिक वातावरणामध्ये आजचे पोटनिवडणूक होत आहे. आताच मी आपल्या सर्वांच्या समक्ष मतदान केले. बारामतीची जनता गेली ६ दशके पवार कुटुंबाच्या मागे उभी आहे. आदरणीय अजितदादा यांच्या बद्दलचे प्रेम विश्वास आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता मोठ्या संख्येने उत्साहाने नव्हे तर कर्तव्य म्हणून मतदानासाठी बाहेर पडत आहेत. आजचे हे मतदान दादांनी बारामतीकरांसाठी इतकी वर्षे केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आहे. दादांना श्रद्धांजली म्हणून सर्व गावांमधून मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. ही पोटनिवडणूक होत असताना बारामतीकरांनीच ही निवडणूक आता हातात घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक जण ही निवडणूक त्यांचं कर्तव्य म्हणून याकडे पाहत आहेत. मतदानासाठी सर्वजण बाहेर पडत आहेत.'
सुनेत्रा पवार यांनी पुढे असेही सांगितले की, 'सगळ्याच बाजूने ही अत्यंत भावनिक निवडणूक आहे. अजितदादांच्या आईंनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला. त्यांचं वय जवळजवळ ९० वर्षे झाले असल्यामुळे त्यांचे मतदान घरीच झाले आहे. त्यांचे आशीर्वाद घेऊन मी आताच इथे आलेली आहे. दादांशिवाय कुठल्याच गोष्टी आम्ही करू शकले नाही त्यामुळे दादा आपल्यात नाही हे मानून आता पुढे चाललं पाहिजे. बारामतीकरांनी हे लक्षात घेतलं आहे त्यामुळे ते मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडतील. बारामतीकरांनी आजपर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यांनी मनावर घेतलं तर ते प्रत्येक गोष्ट करूनच दाखवतात. हे त्यांनी आज मनावर घेतलं आहे आणि मी आज पाहिले आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.