बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

Pawar Family Unity Baramati By Election: बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंबानं एकीची वज्रमूठ आवळलीय... एवढंच नाही तर पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेतून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी कुटुंबाच्या एकीचा संदेश दिलाय..
Supriya Sule attends Sunetra Pawar’s campaign rally, highlighting Pawar family unity in Baramati by-election.
Supriya Sule attends Sunetra Pawar’s campaign rally, highlighting Pawar family unity in Baramati by-election.saam tv
Published On

बारामती पोटनिवडणुकीसाठी अख्खं पवार कुटुंब मैदानात उतरलंय.. एवढंच नाही तर पोटनिवडणुकीच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंनी पक्षीय भेद न ठेवता कुटुंबाला प्राधान्य देत हजेरी लावली.एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीच्या वतीनं सुनेत्रा पवारांना पाठींबा जाहीर केलाय.. त्यानंतर सुनेत्रा पवारांनीही पवारांच्या आई शारदाबाईंची आठवण काढत शरद पवारांचेही आभार मानले.

खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली.. या पोटनिवडणुकीत पवार कुटुंब सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं.. तर शरद पवारांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.. मात्र करुणा मुंडे, अभिजीत बिचुकलेंसह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह 23 जण रिंगणात आहेत...

त्यापार्श्वभुमीवर रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत... त्यामुळे अजित पवारांनी पवार कुटुंबाच्या राजकीय एकत्रिकरणाचं स्वप्न पाहिलेलं जिल्हा परिषद निवडणूक असो वा त्यानंतर आता दादांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीत का होईना पूर्ण होताना दिसतंय... मात्र या पोटनिवडणुकीत पवारांच्या एकीनं नवा रेकॉर्ड तयार होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com