ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जय पवार यांची आता अधिकृतपणे महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जय पवारांवर मोठी जबाबदारी दिली आहे.
जय पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी करण्यात आले आहे. सुनेत्रा पवारांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात जय पवारांच्या नावाचा उल्लेख आहे.
जय पवारांची पहिल्यांदाच पक्षाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. जय पवार आता पक्ष संघटनेत काम करणार आहेत.
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर जय पवार राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर ते राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.
जय पवार याआधी राजकारणात जास्त सक्रिय नव्हते. आता ते स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवत आहेत.
जय पवार यांनी आपले शिक्षण परदेशातून पूर्ण केले आहे. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
जय यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात दुबईत कुटुंबाच्या व्यवसायाची धुरा सांभाळली.
जय पवारांना बिझनेस क्षेत्रात काम करण्याचा चांगला अनुभव आहे. ते आता अजित पवारांनंतर राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.
Next: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक