Maharashtra Politics: बच्चू कडूंना का हवे विलिनीकरण?विधानपरिषदेसाठी बच्चू कडूंची फिल्डिंग?

Bacchu Kadu Eyes Legislative Council Seat: विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी काही तास उरलेले असतानाच आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच आता बच्चू कडू शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत... मात्र बच्चू कडू प्रहारच्या विलिनीकरणाची तयारी का करतायत? त्याच्या पक्ष विलिनीकरणामागे नेमकी काय कारणं आहेत?
Bachchu Kadu hints at Prahar Party merger as MLC election buzz intensifies in Maharashtra politics.
Bachchu Kadu hints at Prahar Party merger as MLC election buzz intensifies in Maharashtra politics.saam tv
Published On

विधानपरिषदेसाठी सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहयला मिळत असताना प्रहारच्या बच्चू कडूंना शिंदेसेनेनं विधानपरिषदेची ऑफर दिल्याची चर्चा आहे..मात्र या ऑफरसाठी अटी आणि शर्ती लागू आहेत. आणि ही अट आहे प्रहार पक्षाच्या विलीनकरणाची. मात्र आता बच्चू कडूंनीही शिंदेंचा पाईक असल्याचं सांगत, प्रहारच्या विलिनीकरणाबाबत अनुकूल भूमिका घेतलीय...

ऐकलतं... शिंदेसेनेसोबत अद्याप चर्चा न झाल्याचं जरी कडू सांगत असले... तरी आठवड्याभरापूर्वी यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये भेट झाल्याचीही चर्चा आहे...तर दुसरीकडे बच्चू कडूंच्या पक्ष विलिनीकरणाच्या चर्चेत मंत्री उदय सामंतांनीही पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतयं... खुद्द बच्चू कडूंनीच सामंताशी फोनवर चर्चा झाल्याची माहिती दिली...त्यावर बोलताना सामंत नेमकं काय म्हणाले ऐका...

मात्र पक्षप्रवेशाच्या चर्चेदरम्यान बच्चू कडू प्रहार पक्ष शिंदेसेनेत का विलीन करतायत? 2024 विधानसभेच्या निवडणुकीत कडूंनी राज्यात 32 उमेदवार रिंगणात उतरवले . मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही...सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडूंचाच पराभव झाला... त्यामुळे पक्षाची ताकद कमी होत असताना सत्तेतील पक्षासोबत जाण्याचा कार्यकर्त्यांनी कडूंकडे आग्रह धरलाय...सत्तेशिवाय शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवणं कठीण झाल्यानं कडूंनी विलिनीकरणाचा घाट घातल्याचं बोललं जातयं. मात्र विलिनीकरणाच्या बदल्यात आमदारकीसह मंत्रिपद घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरलाय. बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक असल्यानं शिंदेसेनेसोबत जुळवून घेणं त्यांना कठीण जाणार नाही. तसंच पक्ष विलिनीकरणानंतर अमराव

सद्यस्थितीत प्रहारचे 1 लाख सक्रिय सदस्य आणि 6 लाख दिव्यांग बांधवांचं जाळं अस्तित्वात आहे...त्यामुळे शिंदेसेना कडूंना विधानपरिषदेवर पाठवणार का? प्रहारमध्ये सबकूछ बच्च कडू असल्यामुळे दुसऱ्य़ा पक्षात गेल्यानंतर आदेश पाळणं कडूंना जमणार का? असे अनेक प्रश्न यानमित्तानं उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com