

महायुती फुटण्याची चर्चा जोरात
संजय शिरसाट यांच्या विधानामुळे खळबळ
भाजप-शिवसेना वेगळे लढण्याची शक्यता
राज्यातील महायुती सरकारमध्ये फुट पडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट वेगळे होणार असून पुढील विधानसभा निवडणूक दोन्ही संघ स्वतंत्रपणे लढवतील असा, अशी चर्चांना उधाण आले आहे. महायुती फुटणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या दोन नेत्यांनी केलेल्या विधानामुळे सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, असा उल्लेख सामना वृत्तपत्रातील संपादकीयमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे (शिंदे) मंत्री संजय शिरसाट यांनीही २०२९ च्या निवडणुकीबाबत मोठे विधान केले.
पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी करत असतो, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. त्यांच्या या विधानाला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला. त्यावरून राजकारण तापलंय.
भारतीय जनता पक्ष भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवेल. भाजपची गाडी फुल झाली आहे, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या शिंदे यांचे आमदारही भाजपामध्ये जातील”, असा उल्लेख सामना या मूखपत्राच्या संपादकीय लेखात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्ष आपली संघटना मजबूत करतो.
निवडणुकांची तयारी करण्याचा प्रयत्न करत असतो. तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. मित्रपक्ष जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांना रोखणारी कोणतीही राजकीय व्यवस्था नाहीये.” भाजप २०२९ ला स्वबळावर निवडणूक लढवू शकतो का? तर लढवू शकतो. हीच गोष्ट शिवसेना पक्षालाही लागू होतें. मित्रपक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवू नये, यासाठी राजकारणात कोणताही करार नसतो.
भाजप आणि शिवसेना वेगळे होऊन अगदी एका जागेसाठीसुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतील, असं संजय शिरसाट म्हणालेत. दरम्यान संजय शिरसाट यांच्या स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या विधानावरून प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान उपटले आहेत. शिवसेनेत याबाबत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांनाच आहे, असं फडणवीस म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.