

एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर ३ सुसाट
विदर्भातील नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
लवकरच ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत
महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घडामोडींना वेगत पावसाळी अधिवेशन संपताच शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर 0.3' ची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा होतोय. दरम्यान या पार्श्वभूमीवर विदर्भातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. विदर्भातील जिल्हा परिषद सदस्य आणि महानगरपालिकेसह नगरपालिकेतील काही नगरसेवक शिंदेसेनेत पक्षप्रवेशाच्या तयारीत आहे.
लवकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. विदर्भातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. प्रकाश डवले यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केलीये. आगामी काळात विदर्भातही मोठे राजकीय बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या तब्बल १० आमदारांचा शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मागील काही दिवसांपासून या आमदारांसोबत अतिशय गुप्त बैठका सुरू आहे. तर २ ते ३ वेळा पक्षप्रवेशावर चर्चाही झाल्या. अखेर याला आता मोठे यश येणार दावा व्यक्त केला जात आहे. या ऑपरेशन टायगर ३ मध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडही रोख आहे. त्यांच्या काही प्रमुख आमदार आणि खासदार सध्या सत्ताधारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहे.
मात्र, अशातच आता विदर्भात देखील शिंदेसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. आगामी काही दिवसांतच एकनाथ शिंदे यांचे उपस्थित विदर्भातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेतील अनेक नगरसेवकांचा पक्षप्रवेश शिंदे गटात होणार आहे अशी माहिती शिंदेसेनेचे विदर्भाचे प्रवक्ता प्रकाश डवले यांनी साम'शी बोलताना दिली.
दरम्यान, अकोल्यात अजित पवार अन् काँग्रेसला शिंदेसेनेने मोठा धक्का दिला होता. १० बड्या नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतमधील ४ काँग्रेसचे, २ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि ४ अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.