'गर्व से कहो हम हिंदू है...'; उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?

Uddhav Thackeray's New Political Strategy: अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणावरून महाराष्ट्रातही राजकारण तापलंय. कारण, रामरक्षा आंदोलनातून ठाकरेसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची वाट धरलीये का? त्यावरचा हा रिपोर्ट.
Uddhav Thackeray's New Political Strategy:
Uddhav Thackeray's New Political Strategy:
Published On
Summary
  • उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

  • उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळत आहेत का?

  • दादर येथील आंदोलनात रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालीसा आणि महाआरती करण्यात आली.

रोहित कदम, साम प्रतिनिधी

ठाकरे सेनेन आता पुन्हा एकदा हिंदुत्वाची वाट धरली आहे की काय .हा प्रश्न उपस्थित होतोय कारण अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाविरोधात ठाकरेसेनेनं केलेलं रामरक्षा आंदोलन. या आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा "गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा देत सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

Uddhav Thackeray's New Political Strategy:
ठाकरेंचे खासदार फोडण्यात फडणवीसांचा हात? MPच्या बंडखोरीस जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ऑपरेशनचं राजकारण

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंनी नेहमीच रामरक्षा म्हणावी असा टोला लगावलाय. उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. खरंतर, उद्धव ठाकरेंनी 2019 साली भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवी युती केली. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजपसह स्वपक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला होता.

Uddhav Thackeray's New Political Strategy:
हिंदूंना लुटणारं सरकार सत्तेत; रामाचं धनुष्य चोरणाऱ्यांची लंका 'मशाली'नं जाळणार, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरेंची ताकद कमी झाली आहे. तर शिंदे सेनेचं वजन वाढलं आहे. ठाकरेंचे एकएक शिलेदार सोडून जात आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे. या पार्श्वभूमिवर राजकारणात यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास धरु पाहत आहेत, अशी चर्चा आहे. रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com