ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण रणनीतीपुढे विरोधक फेल

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ने 'परिवर्तन पॅनेल'चा मोठ्या फरकाने पराभव करून विजय मिळवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक;  एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण रणनीतीपुढे विरोधक फेल
Published On

टीडीसीसी बँक निवडणुकीत कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे यांच्या लढतीत सहकार पॅनलने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. २७ जून रोजी झालेल्या मतदानानंतर २८ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढले. अखेर या निवडणुकीत 'परिवर्तन पॅनल'चा पराभव करत 'सहकार पॅनल'ने मोठा विजय मिळवला.

बहुजन विकास आघाडीसोबत होती चुरस

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेवर अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. बहुजन विकास आघाडीचा पराभव करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला. या निवडणुकीत सहकार पॅनलकडून शिंदेसेनेच्या काही उमेदवारांसोबतच आमदार किसन कथोरेंच्या नेतृत्वात भाजपचे काही उमेदवार उभे होते.

तर त्यांच्या समोर 'परिवर्तन पॅनल' कडून भाजपचे ४ तर शिंदेसेनेचे ३ उमेदवार उभे होते. दोन्ही पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करण्यामागे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याचे कारण दोन्हीही नेत्यांकडून देण्यात आले.

१३ उमेदवार विजयी

निकालात भाजपचे ८ तर शिंदेसेनेचे ५ उमेदवार निवडून आलेत. बँकेच्या निवडणुकीत २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुमतासाठी ११ उमेदवारांची गरज होती, मात्र महायुतीचे १३ उमेदवार विजयी झालेत. यामुळे शिंदे-चव्हाणांची राजकीय चाणक्यनीती यशस्वी ठरल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला या निकालातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com