Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Shiv Sena Leader Vinayak Raut: उद्धव ठाकरे यांच्या बड्या नेत्याविरोधात आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Uddhav Thackeray saam tv
Published On
  • उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा

  • माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात गुन्हा

  • सून गिरीजा राऊत यांच्याकडून पोलिस ठाण्यात तक्रार

  • ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांची कारवाई

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबीक हिंसाचार प्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा यांनी त्यांच्याविरोधात आणि मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात आणि नवरा गितेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी घरगुती हिंसाचारासह जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. गिरीजा यांनी राऊत कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. राऊत कुटुंबाने माझा शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ केला असल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

गिरीजा गीते या ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांनी सासरच्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून आणि ठाकरेंचे नगरसेवक गितेश राऊत यांच्या पत्नी आहेत. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात आणि फिरोज बाबा आणि काजी बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

गिरिजा या ठाण्यातील घोडबंदर रोड मानपाडा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात राहत आहेत. मागील ८ वर्षापासून त्यांचा छळ सुरू असल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. या बाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका बाबाला ताब्यात घेतले आहे. तर राऊत कुटुंबीयांच्या बाबतीत काही माहिती समोर आलेली नाही.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com