Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

Nashik Political News: नाशिकमधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिंदे ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरेंच्या १२ नगरसेवक शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होतेय.
Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला
Eknath Shinde And Uddhav ThackeraySaam TV Marathi News
Published On
  • नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड

  • एकनाथ शिंदे ऑपरेश टायगर राबवणार

  • ठाकरेंचे १२ नगरसेवक फोडणार

  • नाशिक महानगर पालिकेत चर्चांना उधाण

नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील खासदारांच्या ऑपरेशन टायगरनंतर नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे शिंदेसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे १० ते १२ नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरेंच्या अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रभागनिहाय ५ कोटी रुपयांच्या विशेष निधी त्यांना दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना वेग आला आहे. जर ठाकरेंचे नगरसेवक शिंदेगटात गेले तर नाशिकमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढेल.

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला
Maharashtra Politics: शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का; 15 बडे नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार; राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाट

ठाकरेंचे नगरसेवक शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर शिंदेसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिवसैनिकांना विश्वास आहे. प्रत्येकाला वाटतंय आपण एकनाथ शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. विधान परिषद निवडणुकी वेळी संपर्क मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्या अनेक पक्षातील नगरसेवकांची चर्चा झाल्या. यातून तसं काही घडत असेल तर नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे प्रत्येकाला आकर्षण आहे. ५ कोटींचा निधी दिला जाणार या अफवा अशी कमिटमेंट दिलेली नाही. विकास निधी नाशिकच्या विकासासाठी दिला जाईल.'

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला
Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

तसंच, 'वेगळी चर्चा करण्याची गरज नाही. शिवसेनेत आम्ही सर्वांनी एकत्र काम केलेलं आहे. आम्ही रोजच भेटतो, रोजच आमचा संपर्क आहे त्यामुळे वेगळा संपर्क वेगळी बैठक करण्याची गरज नाही. त्यांची इच्छा असेल तर वेलकम आहे. कुठला पक्ष संपावा अशी आमची भूमिका नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचे सर्वांना नैसर्गिक आकर्षण आहे. नगरसेवकच काय येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत खेड्यापाड्यात देखील शिवसेना दिसेल. ऑपरेशन टायगर देखील दाखवायची गरज नाही.', असे देखील अजय बोरस्ते यांनी सांगितले.

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला
Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com