Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Case Register Against Raigad BJP Leader: रायगडमध्ये राजकारण तापले आहे. महाड मुख्याधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकासह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Case Register Against BJP LeaderSaam tv
Published On
  • महाड मुख्याधिकारी मारहाण प्रकरणात मोठी अपडेट

  • भाजप नगरसेवक सूरज बामणेंविरोधात गुन्हा दाखल

  • भाजप नगरसेवकासह दोन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

  • महाड नगरपालिकेमध्ये आंदोलन

सचिन कदम, रायगड

महाड नगर पालिकेतील मुख्याधिकारी यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी भाजप नगरसेवक सुरज बामणे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणी प्रश्नावरून शाब्दिक बाचा बाचीचे रुपांतर हाणामारीत झाले होते. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना लाथबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली होती. या घटनेचा मत्री भरत गोगावले यांनी निषेध केला होता. मारहाण करण्याचा अधिकार नाही, जे केलं ते भोगाव लागणार अशी प्रतिक्रिया मंत्री गोगावले यांनी दिली.

घडलं असं की, रायगडच्या महाड नगर पालिकेच्या नगरसेवकाकडून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण करण्यात आली होती. महाड नगर पालिकेचे नगरसेवक सूरज बामणे आणि त्यांच्यासोबत दोन कार्यकर्त्यांनी धनंजय कोळेकर यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी कोळेकर यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण यासंदर्भात मारहाण करणारा नगरसेवक आणि साथीदारांना अद्याप अटक झालेली नाही.

कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजे असताना महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना भाजप नगरसेवकांसहित अन्य दोघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. या मारहाण प्रकरणी आज महाड नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून काम बंद आंदोलन पुकारले आहे. मारहाण करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा, नगरसेवक पद रद्द करा अशी मागणी हे कर्मचारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com