Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाचा वाद उफाळला; जे शिंदे बोलले, ते तटकरेंना खटकले!

Political Tension in NCP Tatkare Warns Shashikant Shinde: अदृश्य हात आणि धमक्यांमुळे अजितदादांना बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला. या शब्दांवर सुनिल तटकरेंनी आक्षेप घेलतलाय. जर शशिकांत शिंदे पुन्हा असं लिखाण आणि विधान करतील तर त्याला मी उत्तर देईन असे तटकरे म्हणालेत.
Political Tension in NCP  Tatkare Warns  Shashikant Shinde
NCP leaders Sunil Tatkare and Shashikant Shinde amid rising tension over the party merger debate after Ajit Pawar’s demise.saam tv
Published On
Summary
  • अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून वाद पेटला.

  • शशिकांत शिंदे यांच्या लेखावर सुनील तटकरे संतापले.

  • “अदृश्य हात आणि धमक्या” या विधानावर तटकऱ्यांचा आक्षेप.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून वाद पेटलाय. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आता शशिकांत शिंदे आणि सुनिल तटकरे आमने-सामने आलेत. जर तर वर मी बोलणार नसून राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. आज शशिकांत शिंदे यांनी लेख लिहिलाय. यात त्यांनी चुकीचं लिखाण केलं आहे, असं लिखाण त्यांनी करू नये, जर असं लिखाण वारंवार होत असेल तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी उत्तर देईन, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलाय.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक लेख लिहिलाय. त्यावरून आता वाद पेटलाय. शिंदेच्या लेखावर तटकरेंनी आक्षेप नोंदवलाय. यावरून बोलताना तटकरे म्हणाले, मी वारंवार या विषयावर स्पष्टपणे म्हणत आलोय जेव्हा यासंदर्भातला निर्णय जेव्हा कुणी चर्चा सुरू करेल, आमच्या वहिनी सुनेत्राताई नेत्या आहेत. उपमुख्यमंत्री आहेत.

Political Tension in NCP  Tatkare Warns  Shashikant Shinde
"दादा, आता विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील" अमोल मिटकरींचं दिवंगत अजित पवारांना पत्र

पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी आहेत, यासंदर्भात त्या बोलतील. "मी वारंवार या विषयावर स्पष्टपणे सांगितलंय की सुनेत्रा वहिनी आहेत. नेते मंडळी आहेत. ते चर्चा करू शकतात. एखाद्या आघाडीत नवीन पक्ष सोबत येत असतात तेव्हा मुख्य पक्षाला विश्वासात घ्यावे लागते. आता एनडीएचा मुख्य पक्ष भाजप आहे. आमच्यावेळी ही भाजपने सांगितलं मग आम्ही एनडीएमध्ये गेलो, असं तटकरे म्हणाले.

Political Tension in NCP  Tatkare Warns  Shashikant Shinde
12 फेब्रुवारीला होणार होतं NCP चं विलिनीकरण, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्लॅन काय?

शिंदेंच्या लेखात - अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या आणि खोटेनाटे षडयंत्र करून केलेले आरोप यामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता. याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे, परंतु, झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. शिंदेंच्या या लिखाणाला माझा आक्षेप आहे. अशा प्रकारचं वक्तव्य शशिकांत शिंदेंनी दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर लेखी किंवा तोंडी करू नये.

Political Tension in NCP  Tatkare Warns  Shashikant Shinde
मृतदेह खूप जास्त फुगला होता; अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांचा आणखी एक धक्कादायक खुलासा

' अजितदादांनी काय इच्छा लपवून ठेवलेली नव्हती, त्यांनी सर्वांना सांगितले होते. शशिकांत शिदेंचं लिखाण अनाठायी आणि गैर आहे. जबाबदार जुने सहकारी आहेत पण याचा हेतू काय आहे हे माहित नाही. या लेखाचे शीर्षक काय आहे पाहा. अजितदादांच्या निधनानंतर हा लेख लिहिला आहे. त्यानंतर आता काय बोलायचंय विलिनीकरणाबाबत लिहिलंय. असं का बोलतात मला माहित नाही. जर ते वारंवार असं विधान करणार असेल तर राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला उत्तर द्यावं लागेल, असा इशाराही तटकरेंनी दिलाय.

भाजपसोबत असावे ही भूमिका अनेक वर्षांपासून दादांची होती. २०१४ मध्ये तीच भूमिका होती. १६-१७ मध्येही होती. त्यावेळी अंतिम टप्प्यात चर्चा गेली होती. त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो. दादांनी स्वच्छपणे सांगितलं होतं. भाजप-राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकतं. केंद्राची मदत मिळू शकेल. ती इच्छा दादांनी कधीही लपवून ठेवली नव्हती. शशिकांत शिंदेंनी हे लिहिलंय ते अनाठायी आहे. गैर आहे. असं लिखाण करून वेगळं काहीतरी साधू पाहत आहेत, त्यांना नेमकं काय बोलायचं आहे , हे त्यांनाच माहीत...असं लिहिण्यामागचा हेतू काय ते समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com