Senior NCP leaders Sharad Pawar, Supriya Sule and Ajit Pawar during a party event amid merger speculations
Senior NCP leaders Sharad Pawar, Supriya Sule and Ajit Pawar during a party event amid merger speculationsSaam Tv

12 फेब्रुवारीला होणार होतं NCP चं विलिनीकरण, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्लॅन काय?

Ncp Merger Talks After Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी वेग मिळालाय... अशातच 12 फेब्रुवारीला दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार होतं?मात्र विलिनीकरणाची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय.. आणि दादांच्या मृत्यूनंतरही खरंच राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का?
Published on

होय.. अजित पवारांच्या मृत्यूनंतर खुद्द शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय 12 फेब्रुवारीला होणार होता, असं वक्तव्य केलं... आणि विलिनीकरणावरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले. याच दरम्यान सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला... आणि दिल्लीत मोदी-शाहांची भेटही घेतली.. या भेटीत विलिनीकरणाची चर्चाही झाली... मात्र 12 फेब्रुवारीला विलिनीकरण करण्याबाबत झालेल्या चर्चेवर बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या....

दुसरीकडे रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत विलिनीकरणाबाबतचे पुरावे देण्याचं जाहीर केलं होतं..मात्र आता रोहित पवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी जरुर द्यावेत, असं म्हणत रोहित पवारांना चॅलेंज दिलंय... तर रोहित पवारांनीही दादांच्या मृत्यूमुळे आम्ही शांत असल्याचं सांगत तटकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलंय..

खरंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत विधानसभेनंतरच सुरुवात झाल्याची चर्चा रंगली होती... त्यानंतर पवारांचा वाढदिवस....वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट एवढंच नाही तर वारंवार पवार आणि अजितदादांमध्ये बंद दाराआड बैठका झाल्या.. तर अजित पवारांनीही पवार हेच आपलं दैवत असल्याचं वक्तव्य केलं होतं.. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली होती.. मात्र हा चर्चेवर शिक्कामोर्तब झालं ते आधी नगरपालिका आणि त्यानंतर झेडपी निवडणुकीत एकत्र येत निवडणुका लढवण्याच्या निर्णयामुळे... मात्र दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीत एकत्र आली आणि दुसरीकडे अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला..

त्यानंतर विलिनीकरणाची चर्चा बारगळल्याचं म्हटलं जातंय.. मात्र आता मोदी-शाहांनी विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल दिल्यानं सुनेत्रा पवार विलिनीकरणाच्या चर्चा पुढे नेणार का? आणि कुटुंब पुन्हा एकत्र करण्याचा निर्णय घेणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र तुर्तास तरी 12 फेब्रुवारीचा विलिनीकरणाचा मुहुर्त टळलाय... एवढं मात्र निश्चित..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com