Avinash and Satish Warjukar announce resignation from Congress ahead of their BJP entry in Mumbai.
Avinash and Satish Warjukar announce resignation from Congress ahead of their BJP entry in Mumbai.Saam Tv

राज्यात राजकीय भूकंप; काँग्रेसला मोठा धक्का, दोन भाऊ कमळ हाती घेणार

Maharashtra Politics: चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे माजी आमदार अविनाश वारजुकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजुकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर या दोन्ही सख्ख्या भावांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. गुरुवारी मुंबईत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चिमूरमधून मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत पक्षातील नेत्यांच्या असहकार्यामुळे सतीश वारजुकर यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ते पक्षावर नाराज होते, तर त्यांचे मोठे बंधू माजी आमदार अविनाश वारजुकर यांना जिल्ह्याच्या राजकारणात कुठेही स्थान दिले जात नसल्याने ते देखील मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते.

अखेर या दोन्ही भावांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता हे दोन्ही भाऊ उद्या सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबईच्या भाजप पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत, अशी माहिती अविनाश वारजुकर यांनी साम टीव्ही ला दिली.

अंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्ष नेतृत्वाचे दुर्लक्ष, यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या घडामोडीमुळे चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com