Onion Insurance Scam : कांद्यावरुन वांदा होणार? पुणे, साताऱ्यासह ८ जिल्ह्यात मोठा घोटाळा, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश!

Onion Crop Insurance Scam In 8 Districts : राज्यामध्ये कांदा पीक विमामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तालय चौकशी करत आहे.
कांदा पीक विमा घोटाळा
Onion Insurance ScamSaam Tv
Published On

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

कांदा पीक विमासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड या आठ जिल्ह्यात कांदा पीक विमा उतरण्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांना पत्र पाठवून तपासणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने केल्या आहेत. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड या आठ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कांदा लागवड पिकाचं क्षेत्र कमी (Onion Insurance Scam) आहे, परंतु विमा जास्त क्षेत्रावर काढला गेलाय. यामुळे कांदा पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा झाला असावा, असा अंदाज वर्तवला जातोय. विमा संरक्षित झालेल्या क्षेत्रावरील कांदा लागवडीच्या शेतकरीनिहाय याद्या विमा कंपनीकडून प्राप्त करुन घेतलेल्या आहेत. क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत पडताळणी सुरु आहे.

कांदा पीक विमामध्ये मोठा घोटाळा ?

राज्यातल्या ८ जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा उतरवण्यात आल्याचं कृषी विभागाच्या तपासणीत समोर (Crop Insurance) आलंय. लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रांवर विमा काढल्यामुळे काहीतरी घोटाळा झाला असावा. असा संशय असल्यानं पुन्हा तपासणी केली जाणार आहे. कारण जितकी लागवड कांद्याची (Onion Issue) आहे, त्यापेक्षा तीन ते चार पट क्षेत्रावर विमा काढण्यात आलाय.

कांदा पीक विमा घोटाळा
Onion Rate: बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार ? कांद्याचे दर पुन्हा कोसळण्याची भीती

कृषी अधीक्षकांना तपासाच्या सूचना

याबाबत कृषी आयुक्तालयाने आठही जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षकांना पत्र लिहून तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कांदा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही ४६ ते ८१ हजार (Onion Crop Insurance Scam) आहे. त्यामुळे लागवड कमी असतानाही जास्त दाखवून विमा काढण्यात आल्याचा अंदाज आहे. यामध्ये कोण आहे? हे तपासणी झाल्यानंतरच लक्षात येईल. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा लागवड असलेल्या ८ जिल्ह्यात ७५ हजार ३१२ हेक्टर कांदा लागवड करण्यात आली. मात्र, २ लाख ६३ हजार १३६ हेक्टर हेक्टरवर लागवड दाखवून विमा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे त्यात मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे.

कांदा पीक विमा घोटाळा
Onion Crop Insurance : कांदा पिकविम्यासाठी बोगस अर्ज; बीड जिल्ह्यात लागवड ५६७८ हेक्टर, विमा तब्बल २३ हजार हेक्टरचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com