Onion Crop Insurance : कांदा पिकविम्यासाठी बोगस अर्ज; बीड जिल्ह्यात लागवड ५६७८ हेक्टर, विमा तब्बल २३ हजार हेक्टरचा

Beed News : बीड जिल्ह्यात चालू खरीप हंगामात कांदा पिकाची लागवड ५ हजार ६७८ हेक्टरवर झाली आहे. तर याच कांद्याचा २३ हजार ९८३ हेक्टरवर पीकविमा उतरविण्यात आला आहे
Onion Crop Insurance
Onion Crop InsuranceSaam tv
Published On

बीड : पिकांना सरंक्षण कवच मिळावे यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पिकांचा विमा उतरविताना घोळ केला जात असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. हा घोळ कांदा पीक विम्यात झाला असून कांदा लागवडीच्या चार पट अधिकच्या क्षेत्रावरील विमा उतरविण्यात आला आहे. 

बीड (Beed) जिल्ह्यात चालू खरीप हंगामात कांदा पिकाची लागवड ५ हजार ६७८ हेक्टरवर झाली आहे. तर याच कांद्याचा २३ हजार ९८३ हेक्टरवर पीकविमा उतरविण्यात आला आहे. या प्रकरणात कृषी विभाग आणि पिक विमा कंपनी यांच्याकडून संयुक्त पाहणी करून पडताळणी केली जाणार आहे. तसेच शासकीय यंत्रणेकडून तपासणी करुन बोगस अर्ज करणाऱ्यांविरुद्ध जिल्हास्तरीय समितीने कारवाई करावी, असा आदेश कृषी संचालक, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले. यामुळं बोगस विमा काढणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळं आता या बोगस पिक विमा भरणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी (Farmer) शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Onion Crop Insurance
Jayakwadi Dam News : मराठवाड्यासाठी आनंदवार्ता, जायकवाडी धरण काठोकाठ भरलं, पाहा VIDEO


कांदा (Onion) या पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम साधारणतः ४६ हजार ते ८१ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. जास्तीच्या वीमा हव्यासापोटी बोगस पिक विमा काढण्याचे प्रमाण वाढले असल्याचे शासकीय तपासणीत समोर आले आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांत कांदा पिकाचे एकूण क्षेत्र ७५ हजार ३१२ हेक्टर आहे. परंतु विमा संरक्षित केलेले क्षेत्र २ लाख ६३ हजार १३६ हेक्टर आहे. त्यामुळे हे क्षेत्र जवळपास तिप्पट असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com