Jayakwadi Dam News : मराठवाड्यासाठी आनंदवार्ता, जायकवाडी धरण काठोकाठ भरलं, पाहा VIDEO

Paithan Jayakwadi Dam Water Lavel : आज बुधवारी सकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 91 टक्क्यांवर पोहचलाय. सध्या 6 हजार 174 क्यूसेक इतकी आवक सुरू आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढलाय. आज बुधवारी सकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 91 टक्क्यांवर पोहचलाय. सध्या 6 हजार 174 क्यूसेक इतकी आवक सुरू आहे. काल दुपारपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे.

याशिवाय आणि नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे गोदावरी नदीतून येणारी आवक ही कमी झाली आहे. शिवाय जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग केला जातोय. त्यामुळे आता सध्या हळूहळू जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. जवळपास 95% च्या वर त्यानंतर पाणी सोडणे बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. जायकवाडी धरण भरल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com