Onion Rate
Onion Rate

Onion Rate: बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार ? कांद्याचे दर पुन्हा कोसळण्याची भीती

Onion Rate: कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार असल्याचा शक्यता आहे.
Published on

नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हं आहेत. कारण नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव काहीसे वधारताच आता नाफेड आणि NCCF ने खरेदी केलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आल्यास दर कोसळण्याची भिती आहे. पाहूया एक रिपोर्ट.

कांदा, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नुकताच कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी ३५०० ते ३८०० रुपयांचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसं समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र शेतकऱ्यांच्या या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडण्याची चिन्हं आहेत.

कारण कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राकडून नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करण्यात आलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने 'भावस्थिरीकरण निधी' योजनेअंतर्गत या वर्षी बफर स्टॉकसाठी ५ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट्य दिलं होतं. त्यापैकी खरेदी करून साठवून ठेवलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र यामुळे दर कोसळून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होतेय.

सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून शेतकरी त्याची टप्प्याटप्प्याने विक्री करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मुबलक कांदा शिल्लक असताना बफर स्टॉक बाजारात उतरवण्याची घाई का? असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे.

कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला. याबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली. यापूर्वीच कांदा निर्यातीवरील निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते. आता कांद्याला दोन पैसे मिळायला लागले तर लगेचच बफर स्टॉक बाजारात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याने नाराजी आहे. त्यामुऴे लोकसभेसारखाच कांदा सत्ताधा-यांचा विधानसभेतही वांदा करणार का याकडे लक्ष आहे.

Onion Rate
Onion Export: बांगलादेशात हिंसाचारामुळे कांदा निर्यातीला फटका; नाशकातून होणारी कांदा निर्यात ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com