Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग

Government Colleges Name Change: राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांचे नावं लवकरच बदलण्यात येणार आहेत. याबाबत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली नामांतर समिती स्थापन करण्यात आली.
Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग
Government CollegesSaam Tv
Published On
  • महाराष्ट्रातील १६१ शासकीय तांत्रिक विद्यालयांचे नामांतर

  • सरकारी तांत्रिक विद्यालयांना नवीन नावे देण्याचा निर्णय

  • मंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली नामांतर समिती

  • शासकीय तांत्रिक विद्यालयांना महापुरुषांची नावे देण्यात आली होती

गणेश कवडे, मुंबई

राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांचे लवकरच नामांतर होणार आहे. यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आयटीआयप्रमाणेच तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराचा मंत्री लोढांना अधिकार देण्यात आला आहे. याआधी राज्यातील आयटीआय संस्थांना स्थानिक महापुरुषांची नावे देण्यात आली होती. काही ठिकाणी विरोधी पक्षांनी याला विरोध केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांचे नामांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांना स्थानिक महापुरुष, समाजसुधारक किंवा प्रेरणादायी व्यक्तींची नावे देण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग
Kolkata Law College: हॉकी स्टिकनं मारलं, अब्रूचे लचके तोडले, व्हिडिओ काढला; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? पीडितेनं सगळंच सांगितलं

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI संस्थांच्या नामांतराचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता शासकीय तांत्रिक विद्यालयांच्याही नावांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील जवळपास १६१ विद्यालयाचे नामांतर केले जाणार आहे. ITI प्रमाणेच तांत्रिक विद्यालयांना नवी ओळख मिळणार आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये असलेल्या शासकीय तांत्रिक विद्यालयांना स्थानिक इतिहास, सामाजिक योगदान आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महापुरुषांची नावे देण्याबाबत विचार केला जाणार आहे. यासाठी कोणत्या संस्थेला कोणते नाव द्यायचे, याबाबत समिती अभ्यास करून शिफारसी करण्याची शक्यता आहे.

Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग
Kolkata Law College Case : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली

ITI संस्थांना स्थानिक महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही ठिकाणी राजकीय विरोधही झाला होता. काही संस्थांच्या नामांतरावरून स्थानिक पातळीवर मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराचा निर्णय घेताना स्थानिक भावना, ऐतिहासिक संदर्भ आणि विविध घटकांची मते विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे.

शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री मंगलप्रभात लोढा असणार आहेत. ITI संस्थांच्या नामांतराच्या प्रक्रियेला ज्या पद्धतीने अधिकार आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली, त्याच धर्तीवर तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराबाबतही निर्णय घेण्याचे अधिकार मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीला असण्याची शक्यता आहे.

Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग
College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी, १ गंभीर

दरम्यान, नामांतर करताना स्थानिक महापुरुषांचा इतिहास, त्या व्यक्तीचे योगदान आणि संबंधित परिसराशी असलेले नाते याचा विचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या तांत्रिक विद्यालयाला कोणत्या व्यक्तीचे नाव दिले जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे. राज्यातील शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित संस्थांना महापुरुषांची नावे देण्याचा सरकारचा प्रयत्न असला, तरी नामांतराचा निर्णय राजकीयदृष्ट्याही संवेदनशील ठरू शकतो.

Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग
ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

यापूर्वी ITI संस्थांच्या नामांतरावेळी काही ठिकाणी विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराची प्रक्रिया सहमतीने आणि सर्व घटकांचा विचार करून केली जाणार का, तसेच कोणत्या निकषांच्या आधारे नावे निश्चित केली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता मंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या निर्णयानंतर राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवी नावे मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग
College Students Attendance: अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आता हजेरी फक्त बायोमेट्रिक पद्धतीने अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com