Kolkata Law College Case : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली

Kolkata News : कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणाशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींनंतर आता कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाला देखील अटक केली आहे.
Kolkata Law College Case
Kolkata Law College CaseSaam Tv
Published On

Kolkata Law College : कोलकातामधील एका प्रतिष्ठित लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. आरोपींपैकी एकजण हा कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे, तर दोघे सध्या शिक्षण घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये मनोजित मिश्रा, झैब अहमद आणि प्रमित मुखर्जी या तिघांना अटक करण्यात आली आहे. मनोजित मिश्रा या प्रकरणी प्रमुख आरोपी आहे. मनोजित हा क्षिण कोलकाता टीएमसीपी (तृणमूल छात्र परिषद) पक्षाचा सरचिटणीस आहे. पोलिसांनी आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. या आरोपींमध्ये कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे.

Kolkata Law College Case
Ind Vs Eng सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, टीम इंडियाच्या कर्णधाराची तब्येत बिघडली

आरोपी मनोजित मिश्राने पीडितेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पण पीडितेने लग्नाची मागणी नाकारली. याचा आरोपीला प्रचंड राग आला. त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला जखमी केले. तिला मारहाण देखील केली. हॉकीच्या स्टीकने पीडित तरुणाला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ आरोपींनी शूट केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

Kolkata Law College Case
Crime : नोकरीचं आमिष दाखवत वारंवार बलात्कार नंतर जबरदस्तीने गर्भपात, साधूबाबावर महिलेचे गंभीर आरोप

पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून तिचा जबाब देखील नोंदवण्यात आला. साक्षीदारांचेही जबाब नोंदवले. लॉ कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली, तो भाग पोलिसांनी सील केला आहे. सध्या फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे.

Kolkata Law College Case
Pune Police : नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवीन पोलिस उपआयुक्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com