Crime : नोकरीचं आमिष दाखवत वारंवार बलात्कार नंतर जबरदस्तीने गर्भपात, साधूबाबावर महिलेचे गंभीर आरोप

Crime News : बंगालमधील कोलकाता लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने एका साधूबाबावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
Crime
Crimex
Published On

बंगालमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका साधूच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. स्वामी प्रदीप्तानंद असे साधूबाबांचे नाव आहे. त्यांना कार्तिक महाराज म्हणून देखील ओळखले जाते. हे कार्तिक मुर्शिदाबादमधील भारत सेवाश्रम संघाच्या बेलडांगा युनिटशी संबंधित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तब्बल १२ वर्ष जुने आहे. कार्तिक महाराज हे या वर्षी पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांपैकी एक होते. कोलकाता लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

एफआयआरमध्ये महिलेने कार्तिक महाराज यांच्यावर अनेक आरोप केले आहे. हे प्रकरण २०१२ मधले आहे. 'जेव्हा मी पहिल्यांदा कार्तिक महाराज यांना भेटण्यासाठी गेली होती, तेव्हा त्यांनी मला शिक्षिकेची नोकरी देण्याची देऊ केली होती. शाळेच्या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर मला खोली देण्यात आली होती.कार्तिक महाराज मला अनेकदा त्यांच्या कार्यालयात बोलवत असत. त्यांनी अनेकदा माझा लैंगिक छळ केला. माझ्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला', असे आरोप पीडित महिलेने एफआयआरमध्ये केले आहे.

Crime
Pune Police : नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवीन पोलिस उपआयुक्त

'२०१३ मध्ये गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी शाळेतील काही कर्मचाऱ्यांसह मला गर्भपातासाठी बेरहमपूर येथील एका खासगी नर्सिंग सेंटरमध्ये नेले. गर्भपाताला नकार दिल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी मला गर्भपात करण्यास भाग पाडले. मुर्शिदाबाद येथील आश्रमाच्या अनेक शाखांमध्ये माझ्यावर बलात्कार करण्यात आला. नोकरीचे आश्वासन देत त्यांनी माझा फायदा उचलला', असे आरोप पीडितेने केले आहेत.

Crime
Ind Vs Eng सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, टीम इंडियाच्या कर्णधाराची तब्येत बिघडली

पीडिता त्यानंतर म्हणाली, '१३ जून रोजी दोन पुरुष माझ्याकडे आले. आम्ही कार्तिक महाराजांची माणसं आहोत असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर दोघांनी मला एका घराजवळ सोडले. त्या दोघांनी मला कार्तिक महाराजांशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा इशारा दिला' या सर्व आरोपांचे कार्तिक महाराज यांनी खंडन केले आहे. मला फसवण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Crime
जबरदस्तीने शारीरिक संबंध, शरीरावर चाव्याचे-नखांचे व्रण; कोलकाता तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com