ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

Pune Ils Law College Ragging Drug Party Case: पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये रँगिंगचा धक्कादायक प्रकार घडलाय...मात्र याप्रकरणात पोलिसांनी बोलणं टाळलंय.. त्यामुळे कॉलेजच्या वसतिगृहात नशेखोर विद्यार्थ्यांनी कसा हैदोस घातलाय ? आणि तक्ररादार विद्यार्थ्याची रँगिंग कशी करण्यात आली....?
Beer bottles spotted inside ILS Law College hostel premises amid ragging and drug party allegations in Pune.
Beer bottles spotted inside ILS Law College hostel premises amid ragging and drug party allegations in Pune.saam tv
Published On

देशातील नामांकित अशा पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. कॉलेजच्या वसतिगृहात सुरु असलेल्या दारू आणि ड्रग्ज पार्ट्यांविरोधात प्राचार्यांकडे तक्रार केल्यानं काही विद्यार्थ्यांनी टार्गेट करत ओंकार लोखंडे या विद्यार्थ्यांचं रँगिग केल्याचा प्रकार समोर आलाय... रूमच्या दारासमोर जाणीवपूर्वक अंडी फोडणं, घोळक्यानं य़ेऊन शिवीगाळ करणं असे प्रकार लोखंडे याच्यासोबत घडल्यानं त्याने पाच जणांविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केलाय...

पुण्यातील रँगिंगचं नेमकं प्रकरण काय?

ओंकार लोखंडे हा तरुण आयएलएस लॉ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे... कॉलेजच्या वसतिगृहात राहण्यासाठी आल्यावर तिथे काही विद्यार्थी दारू आणि ड्रग्ज पार्टी करत असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं...त्यानंतर लोखंडे याने याप्रकरणी प्राचार्यांकडे तक्रार दाखल केली... मात्र कॉलेज प्रशासनाने याप्रकरणाची कोणतीच दखल घेतली नाही...त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी लोखंडे यांच्या रुमजवळ येऊन शिवीगाळ केल्याचा आणि अंडी फेकल्याचा प्रकार घडला... त्यानंतर लोखंडे याने UGC कडे यासंदर्भात तक्रार दिली...मात्र UGC च्या रँगिगविरोधी समितीकडेही ठोस पुरावा हात न लागल्यानं तक्रारीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही...

दरम्यान याप्रकरणी लोखंडे यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतल्यानं कॉलेज प्रशासनाचेही धाबे दणाणलेत..या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन पोलिसांच्या निदर्शनाप्रमाणे कारवाई करू असं विधान कॉलेजच्या प्राचार्यांनी केलयं..दुसरीकडे साम टीव्ही जेव्हा आयएलएस कॉलेजच्या परिसरात गेलं तेव्हा परिसरात बियर आणि दारूच्या बाटल्या पडलेल्याचं साम टिव्हीच्या निदर्शनास आल.

राज्यात रँगिगच्या घटनांमुळे आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणं याआधी समोर आलेत... अशात पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये रँगिंगचं प्रकरण घ़डणं हे चिंताजनक आहे...त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोपाप्रमाणे कॉलेजचं वसतिगृह खरचं नशेखोरीचा अड्डा झालाय का? नशेखोर तरुणांकडून होणाऱ्या रँगिंगला आळा घालण्यासाठी कॉलेज प्रशासन आणि पोलीस कोणती ठोस पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com