College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी, १ गंभीर

Pandharpur Madha College Building Collapse : पंढरपूर तालुक्यातील माढा येथे रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या निर्माणधीन इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ जण जखमी झाले आहेत. एक जण गंभीर असून चौकशी सुरू आहे.
College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी, १ गंभीर
Pandharpur Madha College Building CollapseSaam Tv
Published On
Summary
  • माढा येथे रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचा स्लॅब कोसळला

  • स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना दुर्घटना

  • नऊ कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

भरत नागणे, पंढरपूर

पंढरपूरमधील माढा येथे रयत शिक्षण संस्थेच्या कला व‌ वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणधीन इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली असून या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असताना अचानक स्लॅब कोसळल्याने ही दुर्घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, रयत शिक्षण संस्थेच्या कला व‌ वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणधीन इमारतीचा सुमारे पंचेचाळीस फूट रुंद व शंभर फूट लांबीचा स्लॅब टाकण्याचे काम दोन मशीनद्वारे सुरू होते. स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात स्लॅबवर काम करणारे कामगार खाली चहा पिण्यासाठी आल्याने मोठा अनर्थ टळला. स्लॅबवर काम करणारे कामगार जखमी झाले.

College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी, १ गंभीर
Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

घटनास्थळी धावपळ सुरू झाली. घटनेवेळी घटनास्थळाजवळून जाणारे गणेश साळुंखे,भोलानाथ पाचंगे, शितल कानगे, नागनाथ मारकड, वैजिनाथ माळी यांनी जखमींना बाहेर काढून‌ डॉ. मस्के हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमीमधील संभाजी बागल यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात हलविले. घटनास्थळी तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार विजय कवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर, तलाठी पुरूषोत्तम जगदाळे , कोतवाल किशोर ढावरे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.  

College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी, १ गंभीर
Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

या घटनेत संभाजी बागल‌ (रा. भोसरे) , परमेश्वर अर्जुन लोंढे (रा. चिंचोली वय ४५) दत्तु नारायण जाधव (महाळुंग वय ४०) , संतोष पांडुरंग मलगुंडे (भोसरे ४६), दत्तात्रय बळीराम रेडे ( भोसरे वय ३५), उमेश सतिश मदने (महाळुंग वय २६), विशाल निळू गायकवाड (जामगाववय २०), शंटू गोकूळचंद्र सरकार (कोलकत्ता वय ५०), कानन कालिचरण मंडोल (कोलकत्ता वय ३०) जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com