Shocking : सूनेचं प्रेमप्रकरण कळलं, सासरा अडवायला लागला; तिनं बॉयफ्रेंडला गळ घातली अन् शेवट झाला भयंकर
Sangli Crime NewsSaam Tv

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

Sangli Crime News : सांगलीमध्ये किरकोळ वादातून तीन तरुणांनी मुलासमोरच वडिलांची निर्घृण हत्या केली. आरोपींना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
Published on
Summary
  • सांगलीत मुलासमोरच वडिलांची निर्घृण हत्या

  • किरकोळ वादातून तीन तरुणांचा प्राणघातक हल्ला

  • हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी

  • नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

  • विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

विजय पाटील, सांगली

सांगलीमधून अंगावर काटा बातमी समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांचा पोटच्या मुलासमोरच हत्या केली असल्याची संतापजनक घटना घडली आहे. शहरातील इनाम धामणी रोडवर ही हत्या करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50) असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किर्तीकुमार शेडबाळे हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणीजवळ असणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून जात होते. या दरम्यान रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन तरुणांसोबत किर्तीकुमार यांचा वाद झाला. हा वाद एवढा वाढला की अज्ञात तीन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Shocking : सूनेचं प्रेमप्रकरण कळलं, सासरा अडवायला लागला; तिनं बॉयफ्रेंडला गळ घातली अन् शेवट झाला भयंकर
Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

हा हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला, तर हल्लेखोरांनी मुलाच्या समोरच वडिलांनाची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Shocking : सूनेचं प्रेमप्रकरण कळलं, सासरा अडवायला लागला; तिनं बॉयफ्रेंडला गळ घातली अन् शेवट झाला भयंकर
Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

मात्र संतप्त जमावाने हल्लेखोरांना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन खून झाला,हे स्पष्ट होऊ शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com