

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. आता विद्यार्थांना कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थांना रोजच्या रोज कॉलेजला उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे. हा मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजला उपस्थित राहण्याची संख्याही वाढणार आहे.
काही विद्यार्थी हे नुसते नावापुरती कॉलेजला जातात. विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत काहीच कल्पना नसते. शिवाय शिक्षकांनाही त्याबद्दल कल्पना नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. महत्वाचं म्हणजे काही विद्यार्थी हे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन कॉलेज बुडवतात. आता त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे.
इयत्ता बारावीचे कॉलेज जून महिन्यात सुरु होईल. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची ठरणार आहे. तसेच शिक्षकांच्या कामात आता भर पडली आहे. शिक्षक विद्यार्थांची हजेरी नोंदवत असतात. आता त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा पाहावे लागणार आहेत. विशेषता मुथ्यध्यापकांना आता प्रत्येक वर्गातली उपस्थिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहावी लागणार आहे.
जे विद्यार्थी शाळा- कॉलेजमध्ये नियमित उपस्थित राहत नाहीत. तसेच जे खासगी कोचिंग क्लासेसला पहिलं प्राधान्य देतात. त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. बऱ्याचदा या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत होत्या. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत करार केल्याच्याही चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.