Ultraviolette X47 Launch : 15 हजारांनी स्वस्त! 145KM टॉप स्पीडसह Ultraviolette ची नवी EV बाइक लॉन्च

Sakshi Sunil Jadhav

बाईकचा ट्रेंड

सध्या प्रत्येकाच्याच दारासमोर तुम्हाला बाईक पाहायला मिळत असेल. अशातच अल्ट्रावॉयलेट ऑटोमोटिव्हने X47 इलेक्ट्रिक बाइक रेंजमध्ये नवीन एंट्री-लेव्हल व्हेरिएंट लॉन्च केला आहे.

electric bike India

नवीन व्हेरिएंट लॉन्च

अल्ट्रावॉयलेटने X47 सीरिजमध्ये नवीन बेस मॉडेल आणलं आहे. यामुळे ग्राहकांना कमी किमतीत प्रीमियम इलेक्ट्रिक बाइकचा ऑप्शन उपलब्ध झालेला दिसत आहे.

Ultraviolette electric bike

किंमत किती कमी?

नवीन X47 बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 2.49 लाख रुपये आहे. हे मॉडेल आधीच्या X47 Original व्हेरिएंटपेक्षा सुमारे 15 हजार रुपयांनी स्वस्त आहे.

Ultraviolette electric bike

Hypersense फीचर

किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीने या मॉडेलमधून Hypersense रडार सिस्टम काढून टाकली आहे. त्यामुळे काही प्रीमियम सेफ्टी फीचर्स उपलब्ध नाहीत.

Ultraviolette electric bike

प्रगत सेफ्टी फीचर्समध्ये बदल

आधीच्या मॉडेलमध्ये रियर कोलिजन वॉर्निंग, लेन चेंज असिस्ट, ओव्हरटेक अलर्ट आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शनसारखे फीचर्स मिळत होतं. पण आता नवीन बेस मॉडेलमध्ये हे फीचर्स देण्यात आलेले नाहीत.

211km range bike

दमदार इलेक्ट्रिक मोटर

तुम्ही या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 27kW क्षमतेचा वापर करू शकता. त्यामुळे बाइकचा परफॉर्मन्स पूर्वीसारखाच दमदार ठेवण्यात आला आहे.

211km range bike

टॉप स्पीड

ही बाइक 145 किलोमीटर वेगाने धावते. तसेच 0 ते 60 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी तिला फक्त 2.8 सेकंद लागतात.

211km range bike

211 किलोमीटरची रेंज

बाइकमध्ये 7.1kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाइक IDC प्रमाणित 211 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते.

211km range bike

सेफ्टी आणि स्मार्ट फीचर्स

नवीन X47 मध्ये ड्युअल-चॅनल ABS, डायनॅमिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल-होल्ड आणि पार्क असिस्ट यांसारखे फीचर्स स्टँडर्ड स्वरूपात मिळतात.

211km range bike

तीन रायडिंग मोड्स

या बाइकमध्ये ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक असे तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत. तसेच Wi-Fi आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचाही सपोर्ट मिळतो.

211km range bike

NEXT: कोणालाच कमी समजू नका, चाणक्यांची ही गोष्ट लक्षात ठेवाच

Chanakya life lessons
येथे क्लिक करा