Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात.
चाणक्य सांगतात की, रस्त्यावर पडलेल्या धुळीला कोणीच महत्त्व देत नाही. पण तीच धूळ पायाखाली आली की उडते आणि डोळ्यात गेल्यावर वेदना निर्माण करू शकते.
एखादी व्यक्ती काही कारणांमुळे हरली असेल. काही करू शकत नसेल तरी भविष्यात ती मोठं यश मिळवू शकते. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका.
जीवनात परिस्थिती सतत बदलत राहते. त्याचप्रमाणे आज कमजोर वाटणारी व्यक्ती उद्या मोठी यशस्वी होऊ शकते.
चाणक्यांच्या मते, सामर्थ्यवान व्यक्तींनी अहंकार बाळगणं टाळा. अहंकारामुळे इतरांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष होतं.
प्रत्येक व्यक्तीमध्ये परिस्थिती बदलण्याची आणि स्वतःचं भविष्य घडवण्याची ताकद असते. त्यामुळे कोणालाच कमी लेखू नका.
स्वतःला कमकुवत समजू नका. अन्याय सहन करत राहणं ही सर्वात मोठी चूक आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे.
स्वाभिमान हा व्यक्तीच्या शक्तीचा आधार असतो. आत्मसन्मान टिकवून ठेवणारी व्यक्ती संकटांवर मात करू शकते.