शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा; 34 बोगस शिक्षक, प्रत्येकी ४,५०,००० ची ‘सेटिंग’

34 Fake Teachers Shalarth ID Fraud Maharashtra Investigation: नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठा खुलासा समोर आला असून 34 बोगस शिक्षकांसाठी बनावट मान्यता देताना प्रत्येकी साडेचार लाख रुपये घेतल्याची आरोपीची कबुली. तपास यंत्रणांनी आर्थिक व्यवहारांचा शोध सुरू केला आहे.
Nashik Shalarth ID scam investigation intensifies as आरोपी admits taking ₹4.5 lakh per fake teacher.
Nashik Shalarth ID scam investigation intensifies as आरोपी admits taking ₹4.5 lakh per fake teacher.saam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकमधील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात 34 बोगस शिक्षकांच्या शालार्थ आयडीसाठी बनावट मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी साडेचार लाख रुपये घेतल्याची कबुली आरोपी प्रशांत वाडीले याने चौकशीदरम्यान दिल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Shalarth ID scam investigation intensifies as आरोपी admits taking ₹4.5 lakh per fake teacher.
भय इथले संपेना! बीडमध्ये २४ तासांत २ हत्या; बसस्थानकाजवळ आढळला शिक्षकाचा मृतदेह तर आंबेजोगाईत तरुणाला संपवलं

या खुलाशामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून तपास यंत्रणांनी आर्थिक व्यवहार आणि संबंधितांची भूमिका तपासण्यास वेग दिला आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धागेदोरे समोर येत आहेत. चौकशीदरम्यान आरोपी प्रशांत वाडीलेने 34 बोगस शिक्षकांच्या शालार्थ आयडीसाठी बनावट मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी साडेचार लाख रुपये घेतल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे.

Nashik Shalarth ID scam investigation intensifies as आरोपी admits taking ₹4.5 lakh per fake teacher.
भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

या प्रकरणात मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त केला जात असून संबंधित अधिकारी, मध्यस्थ आणि लाभार्थी यांची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा कागदपत्रे, बँक व्यवहार आणि इतर पुरावे तपासत असून या घोटाळ्याचे आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणामुळे शिक्षण विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com