65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

Fake Shalarth ID Scam Maharashtra Details: राज्यभर गाजलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी कारवाई करत नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने प्रशांत वाडीले याला धुळ्यातून अटक केली. तपासात 65 पैकी 63 शाळा बनावट असल्याचा धक्कादायक संशय व्यक्त होत आहे.
Accused Prashant Wadil produced in Dhule court after arrest in fake Shalarth ID scam
Accused Prashant Wadil produced in Dhule court after arrest in fake Shalarth ID scamSaam Tv
Published On

भूषण आहीरे, साम टीव्ही

धुळे: राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला धुळे येथून अटक करण्यात अली आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून आज वाडीले याला धुळे न्यायालयात हजर करण्यात आले.

Accused Prashant Wadil produced in Dhule court after arrest in fake Shalarth ID scam
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

अटकेनंतर नाशिकच्या पथकाने प्रशांत वाडीले यांच्या धुळ्यातील निवसस्थानावर झाडाझडतीही घेतली. या झाडाझडतीतून महत्वाची कागदपत्रे आणि पुरावे हाती लागण्याची शक्यता असून या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Accused Prashant Wadil produced in Dhule court after arrest in fake Shalarth ID scam
Deputy Collector : २ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई; महसूल विभागात मोठी खळबळ

दरम्यान या प्रकरणातील मुख्य फिर्यादी पंकज साळुंखे यांनी गंभीर आरोप करत आणखी काही संस्थाचालक आर्थिक गुन्हा शाखेच्या रडारवर असल्याचे सांगितले आहे. त्यांनी दावा केला की, प्रशांत वाडीले यांच्या नावावर तब्बल 65 शाळा दाखवण्यात आल्या असून, त्यापैकी 63 शाळा बनावट असल्याचा संशय आहे. केवळ शिंदखेडा आणि साक्री येथे दोनच शाळा प्रत्यक्षात सुरू असल्याही माहिती त्यांनी दिली.

Accused Prashant Wadil produced in Dhule court after arrest in fake Shalarth ID scam
Deputy Collector : २ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई; महसूल विभागात मोठी खळबळ

याचबरोबर, या संपूर्ण प्रकरणाची आतापर्यंत झालेली चौकशी रद्द करून न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पंकज साळुंखे यांनी केली आहे. प्रशांत वाडीले याच्या अटकेनंतर या बहुचर्चित प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येणार असल्याचे मानले जात असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com