राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

Farmers in Vidarbha Suffer as Fake Seeds Fail to Germinate: यंदाच्या खरीप हंगामात राज्यात बोगस बियाण्यांच्या विक्रीचं रॅकेट समोर आलंय. त्यामुळे बोगस बियाणं खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. तब्बल तिसऱ्यांदा पेरणी करूनही बियाणं उगवत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...
Farmers inspect failed crops in Vidarbha after fake seeds fail to germinate, leading to repeated sowing and heavy losses.
Farmers inspect failed crops in Vidarbha after fake seeds fail to germinate, leading to repeated sowing and heavy losses.saam tv
Published On

एकीकडे पावसानं ओढ दिलेली ओढ तर दुसरीकडे पेरलेलं उगवतं नाही, अशा दुहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला आहे. बोगस खत विक्रीचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर विदर्भात बोगस बियाण्यांच्या विक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय. ऐन खरीपाच्या हंगामात राज्यातील शेतकऱ्यांची खुलेआम फसवणूक होतेय. पेरणी करून महिना उलटून गेला असली तरी बियाण्यांना अंकुर न फुटल्यानं शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. अमरावतीमधील एका संतप्त शेतकऱ्यानं थेट कृषी अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतलय

बोगस बियाण्यांमुळे केवळ दुबार पेरणीचं संकट निर्माण झालेलं नसून त्याचा आर्थिक फटकाही शेतकऱ्याला बसतोय. यवतमाळ जिल्ह्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल तिसऱ्यांदा पेरणी करूनही सोयाबीन उगवलं नसल्यानं शेतकरी कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं कोलमडलंय तेही ऐका...

तर दुसरीकडे, अकोल्यात प्रयोगशाळेतील चाचणीनंतर बियाणं निकृष्ट दर्ज्याचं स्पष्ट झालंय. 'साम टीव्ही'च्या बातमीनंतर निकृष्ट दर्जाचे बियाणं देणाऱ्या कंपन्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होत आहेत. इतकंच नव्हे राज्यात बोगस बियाणांसह बोगस खतांची विक्रीही समोर आली होती. त्यामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी आवाहन करणारं सरकार या बोगस कंपन्यांवर काय कारवाई करणार? आणि या संकटातून सावरण्यासाठी सरकार बळीराजाला काय मदत करणार? याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com