Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

Agriculture Minister Manikrao Kokate Press Conference Live Update : अजित पवार यांच्या नेत्याचे कृषीमंत्रिपद धोक्यात आलेय. कार्ड गेमच्या व्हिडिओवर आज माणिकराव कोकाटे पत्रकार परिषद घेणार, राजीनाम्याची शक्यता.
Manikrao Kokate Press Conference
Agriculture Minister Manikrao Kokate under fire for playing card game in Assembly; resignation likely todaySaam TV News Marathi
Published On

Manikrao Kokate Press Conference On Viral Video : पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत कार्ड गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. विरोधकांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली. माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांनीही कोकाटे यांना समज दिली. आता कार्ड गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. माणिकराव कोकाटे आज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषदेत व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देणार आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, माणिकराव कोकाटे आज तडकाफडकी राजीनामा देऊ शकतात. सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये कृषीमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओवरून चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात चर्चा झाली. (Will Agriculture Minister Kokate resign after viral Rummy clip?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर कार्ड गेम खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोकाटे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यातच याच प्रकरणावर लातूरमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणावरुन राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं. अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्याकडून पदाचा राजीनामा घेण्यात आला. आज माणिकराव कोकाटे पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Manikrao Kokate Press Conference
गेमनं गेम केला, माणिकराव कोकाटेंचे कृषीमंत्रिपद धोक्यात, सुनील तटकरेंकडून मिळाले कारवाईचे संकेत
विधिमंडळ सभागृहात असताना गांभीर्य असणं गरजेचं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काहीही स्पष्टीकरण दिलं असलं तरीही ते आमच्यासाठी भूषणावह नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आज राजीनामा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आज मंगळवारी सकाळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकार परिषद घेणार आहेत. विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनामाचे मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केलीय. या सर्व पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये रमी प्रकरणावर काय बोलतात, याकडे लक्ष लागलेय. माणिकराव कोकाटे कृषीमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Manikrao Kokate Press Conference
Latur Band : छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण, राज्यात पडसाद, आज लातूर बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com