
Latur band Latest News Update : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. लातूरमध्येमध्ये आज सर्वपक्षीय नेते, संघटना सहभागी होणार आहेत. घाडगे यांना सूरच चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यावरून लातूरमध्ये रविवारी जोरदार राडा झाला. त्यानंतर छावा संघटना आक्रमक झाली असून लातूर बंद पुकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर विरोधकांनी या प्रकरणामुळे टीका केली आहे. (Who attacked Vijay Ghadge in Latur?)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना रविवारी बेदम मारहाण केली. दरम्यान या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते, संघटना सहभागी होणार आहेत. तर मारहाण झाल्यानंतर विजय घाडगे यांच्या तोंडावरती छातीत आणि पोटात मार लागल्याने त्यांना लातूरच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लातूरमधील छावा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (Political violence at press conference in Latur)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी लातूरमध्ये होते. त्यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान चांगलाच गोंधळ उडाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली अन् पत्ते फेकून निषेध नोंदवला. विधानभवन हे शेतकऱ्यांच्या कष्टाचं सभागृह असल्याचे सांगत, माणिकराव कोकाटे यांनी घरी बसूनच रमी खेळावं,” अशी घोषणाबाजी केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. लातूर पोलिसांनी अखेर मध्यस्थी करत हे भांडण मिटवले. पण तोपर्यंत याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, याचे पडसाद राज्यात पडले आहेत. (Manikrao Kokate resignation demand by activists)
राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच आहे. या विषयावर लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांना निवेदन देत असताना झालेला वाद दुर्दैवी आहे. तटकरे साहेबांवर अशा प्रकारे पत्ते फेकणे चुकीचेच आहे, परंतु त्यांनतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना करण्यात असलेली मारहाण अधिक चुकीची आहे. लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू हा संदेश सत्ताधारी देऊ पाहत आहेत का?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.