
अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
Fake note fraud by woman in scarf in Akola : बनावट नोटांचे लोन आता अकोला शहरात गेल्याचे समोर आले आहे. अकोल्यामध्ये ५०० रूपयांच्या बनावट नोटा मिळाल्या आहेत. एका अनोळखी महिलेने दुकानदाराला ५०० रूपयांच्या बनावट नोटा देऊन फसवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बनवाट नोटांची चर्चा अकोल्यात सुरू आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातल्या श्रीराम सुपर शॉपीमध्ये एका महिलेने दुकानदाराला 500 रूपयांच्या बनावट नोटा देत गंडवलंय. स्कार्फ बांधून आलेल्या अनोळखी महिलेने गळतीचा फायदा घेत दुकानदाराची फसवणूक केली. अशातच आता मार्केटमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा अकोला जिल्ह्यात रंगायला सुरूवात झाली आहे. स्कार्प बांधून आलेल्या महिलेने एका दुकानदाराची बनवाट नोटा देत फसवणूक केल्याचा हा प्रकार समोर आलाय.. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आलेत. दरम्यान, बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रकार अनेक वेळा ऐकायला येतोये.. या नोटा बहुतांश 500 अथवा 100 रुपयांच्या असतायेत.. या हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे अनेकदा नागरिकांना गंडवलं जात आहे.
यापूर्वीही 100 आणि 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात-
दरम्यान, 28 जून 2024 रोजी अकोल्यातल्या मुर्तीजापुर शहरात 100 आणि 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या बनावट नोटा महिलांकडून चलनात आला असल्याचा दावा मेडिकल चालकाने केला होता. हुबेहूब शंभर आणि पन्नास रुपयांसारख्या दिसणाऱ्या ह्या बनावट नोटा महिलांकडून चलनात पसरवल्या जात होत्या. मुर्तीजापुर शहर पोलिसांनी ह्या बनवाट नोटा ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला होता. दरम्यान, आता अकोलेकरांनी अर्थातच नागरिकांनी सावध होणं गरजेच आहे. कारण, तुम्ही घेत स्वीकारत असलेल्या नोटा खऱ्या आहे की नाही? याची पडताळणी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकंदरीत अकोल्यात 500 रुपयांच्या आणि काही दिवसांपूर्वी 100 आणि 50 रुपयांच्या नोटा चलनात आल्यामूळ अकोल्यात खळबळ माजली आहे. छोट्या नोटा बाजारात सहजपणे स्वीकारल्या जातात त्यामुळे नोटा तपासून घ्यावे, असं आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.