Sunil Tatkare statement on action against agriculture minister: विधिमंडळाच्या सभागृहात मोबाइलवर कार्डचा गेम खेळणं कृषीमंत्र्यांना चांगलेच जड जाणार असल्याचं समजतेय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य केलेय. लातूरमध्ये रविवारी झालेल्या राड्यानंतर तटकरे आज तुळजापूरमध्ये आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सूरच चव्हाण यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. त्याशिवाय माणिकराव कोकाटे यांच्याबाबतही अजित पवार निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य केले आहे.
कृषीमंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे वारंवार चर्चेत राहिलेत. शेतकऱ्यांसदर्भात कोकाटेंनी वादग्रस्त विधाने केल्यामुळेही अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेकदा अडचणीत सापडला. तीन दिवसांपूर्वी कोकाटे यांचा विधिमंडळात कार्ड गेम खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी पोस्ट केला अन् पुन्हा एकदा अजित पवारांवर टीकेची झोड सुरू झाली. राज्यात पावसामुळे पेरण्या रखडल्या, शेतकरी आत्महत्या करत असताना कृषीमंत्री विधिमंडळात गेम खेळण्यात व्यस्त असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला होता. विरोधकांनी रान उठवलं अन् कृषीमंत्री, अजित पवार आणि फडणवीस सरकारला घेरलं. त्यातच लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे आगीत तेल ओतलं गेलं. हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. सूरज चव्हाण यांना अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. तर सुनील तटकरेंनी माणिकराव कोकाटे यांच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, म्हणत मोठे संकेत दिले आहे. माणिकराव कोकाटेंचा राजीमाना घेतला जाणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
लातूरमध्ये झालेली घटना दुर्दैवी अन् निंदनीय आहे. त्याचा मी निषेध व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शांततेच्या मार्गाने आणि आदाराने राजकारण करत आलेला पक्ष आहे. लातूरमध्ये काल घडलेला प्रकार निंदनीय आहे. छावा कार्यकर्त्यांचा संताप मी समजू शकतो. पावसाने ओढ दिली, कृषीमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे त्यांच्या संतप्त भावना मी समजू शकतो. त्यांनी पत्ते जरी टाकले तरी मी शांतपणे त्यांचे निवेदन स्वीकारले, त्यांचे आभार मानले.
सूरज चव्हाण यांच्याकडून घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. पक्ष त्याची गांभीर्याने नोंद घेईल. सूरच चव्हाण यांना अजित पवार यांनी मुंबईमध्ये तातडीने बोलवले आहे. अजित पवार त्यांना समज आणि सूचना देतील, असे सुनील तटकरे म्हणाले. सूरज चव्हाण आणि कोकाटे यांच्याविरोधात पक्ष निश्चितपणे योग्य तो निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून काही वेळा शेतकऱ्यांसदर्भात आलेली वक्तव्ये चुकीची होती. त्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटेंना समज दिली. या प्रकरणीचीही अजित पवार यांनी नोंद घेऊन कोकाटे यांना समज देतील, अथवा दिलीही असेल, असे तटकरे म्हणाले. कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या वक्तव्याबाबत याआधीच कडक समज देण्यात आलेला आहे, असे तटकरेंनी तुळजापूरमध्ये सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.