Chaddi Gang Video : सोलापुरात चड्डी गँगची दहशत, साखर झोपेत असताना साधतेय डाव, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Solapur chaddi Gang video : घरफोडी करण्यासाठी सोलापूर शहरात मध्यरात्री चड्डी गँग फिरतेय. पोलिसांची गस्त वाढल्यानंतरही धाडस : वसंत विहार,थोबडे नगर परिसरात सीसीटीव्हीमध्ये कैद
Solapur chaddi Gang video :
Solapur chaddi Gang video :Saam TV News Marathi
Published On

Solapur Chaddi Gang CCTV video : सोलापूरकरांनो, जेव्हा तुम्ही रात्री साखर झोपेत असता तेव्हा तुमच्या गल्लीत, कॉलनीमध्ये चोरी करण्यासाठी चड्डी गैंग फिरत आहे. यामुळे सावधान राहा. शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता चड्डी गँगमुळे शहरवासीयांची झोप उडाली आहे. वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी,धानम्मा नगर आदी परिसरात रविवारी पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान चौघे चेहरा पूर्णतः काळ्या कापड्याने झाकून अंगावर काळा टी शर्ट अन् चड्डीवर फिरत असल्याचे दिसून आले.

शहरातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शहरातील सात पोलिस ठाणे हद्दीत अचानक नाकेबंदी करत तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.शिवाय रात्री ही सशंयितांची तपासणी केली जात आहे. पोलिस एवढे सतर्क असूनही शहरात चड्डी गँग मोकाट फिरत आहे.ही सर्व चड्डी गँग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Solapur chaddi Gang video :
Latur Band : छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण, राज्यात पडसाद, आज लातूर बंद

वसंत विहार, गायत्री नगर,संकेत थोबडे नगर,निखिल थोबडे नगर,धानेश्वरी नगर,स्वराज नगर,आर्यनंदी नगरसह स्वराज्य विहार,व्यंकटेश्वर सिटी अशी उपनगरे वसली आहेत. जवळपास २५ हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. महापालिकेला सर्वाधिक टॅक्स भरणारा हा परिसर आहे. नेमक्या अशाच परिसराला हेरुन चड्डी गँग लक्ष्य करीत आहे.

Solapur chaddi Gang video :
Mumbai : ऑटोमध्ये पिटबुलने मुलाच्या मानेचे लचके तोडले, वाचवण्याऐवजी मालक खिदळत राहिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com