Latur Crime : सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या, लातूरमधील संतापजनक घटना

Latur News: बदलापूरमधील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच लातूरच्या औसा तालुक्यातही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.
सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या, लातूरमधील संतापजनक घटना
Latur CrimeSaam Tv
Published On

संदीप भोसले, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यात एका मागून एक अत्याचार आणि बलात्काराच्या घटनेच सत्र सुरूच आहे. बदलापूरमधील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच लातूरच्या औसा तालुक्यातही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

माल्ल्या माहितीनुसार, या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी 31 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या, लातूरमधील संतापजनक घटना
Vaibhav Naik: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, आमदार वैभव नाईक यांनी PWD कार्यालय फोडलं

सरपंच पुत्राकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

दरम्यान, दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधमाला अटक केली. आरोपी हा सरपंचाचा पुत्र आहे.

पीडिता ही अमरावती येथील शाळेत नवव्या वर्गात शिकते आणि दररोज एसटी बसने ये-जा करते. शनिवारी सायंकाळी ती स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती. याचदरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्राने गावाच्या वाटेवर तिला हेरले. त्याने तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला, तेव्हा विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला.

सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या, लातूरमधील संतापजनक घटना
Kangana Ranaut: शेतकरी आंदोलनाविरुद्ध केलं वक्तव्य, कंगना रणौत यांना भाजपने सुनावले खडेबोल

मात्र नंतर तिने मोबाईलवरून कुटुंबीयांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली. मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली. आरोपी तिला गावाच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com