Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026Saam Tv

Maharashtra Budget 2026: लाडक्या बहिणींना ₹२१०० मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, लखपती दीदीवरही मोठा निर्णय, वाचा काय म्हणाले

Ladki Bahin yojana Announcement in Maharashtra Budget 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
Published on
Summary

अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना गिफ्ट

लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार-देवेंद्र फडणवीस

लखपती दीदी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे. या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांच्यासाठी धोरण आणले जाणार आहे. आतापर्यंत ३७ लाख लखपती दीदी झाल्या आहेत. आणखी २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे योजना आहे. उमेद मॉल विक्री करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026: मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा, पण किती रूपयांपर्यंत माफ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्व माहिती

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची घोषणा (Ladki Bahin yojana Announcement by Devendra Fadnavis)

अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठीच्या योजनांचीही घोषणा झाली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील लाडक्या बहि‍णींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार, अशी घोषणा केली. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं

Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget: तिसरी आणि चौथी मुंबई; नेमकं काय काय करणार ? मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

२१०० रुपये मिळणार का?

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठीच्या निधीची तरतूद केल्यानंतर विरोधकांनी २१०० रुपयांबाबत प्रश्न विचारले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, काळजी करु नका, तुमच्या मनातील गोष्ट आम्हीच पूर्ण करणार. फक्त योजनेविरोधात कोर्टात जाऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित, मुख्यमंत्र्यांकडून २ मोठ्या घोषणा

आणखी २५ लाख लाडक्या बहिणींना लखपती करणार (Lakhpati Didi Yojana Annoucement)

एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण केले जाईल. त्यानंतर त्यांच्या कल्याणासाठी धोरण आणले जाईल. महाराष्ट्रा ग्रामीण जीवन्नोती अभियानाअंतर्गत आतापर्यंत ३७ लाख लखपती दीदी झाल्या आहे. २०२५-२६ मध्ये आणखी २५ लाख महिलांनी लखपती करण्याचे उद्दीष्ट आहे. महिला स्वयं सहायता समूहांचे वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्रासाठी मंजुरी दिली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Maharashtra Budget 2026
Maharashtra budget session : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com