Home : मोठी बातमी! नवी मुंबईतील ७२ हजार झोपडीधारकांना मिळणार फुकटात घर, सर्वेक्षण सुरू

Navi Mumbai housing scheme : नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात सुमारे ७२ हजार झोपडीधारकांना घर मिळणार. पात्रांना मोफत आणि इतरांना सवलतीच्या दरात घर देण्यासाठी सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू.
Home
HomeSaam Tv
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Navi Mumbai free housing eligibility rules : नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातील झोपडी धारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे. पात्र झोपडीधारकांना फुकटात घर मिळणार आहे. तर अपात्र झोपडी धारकांना अडीच लाखात घर मिळणार आहे. यासाठी झोपडी धारकांचे सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक तात्काळ करण्याचे आदेश आज गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बैठकीत घेतला असल्याचं भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय.

डॉ.पंकज भोयर साहेब (राज्यमंत्री – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म) यांच्या दालनात झोपडीपट्टी पुनर्वसन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत झोपडीपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव, तसेच विविध शासकीय विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बैठकीत GBR प्रोसेस मध्ये झोपडपट्टी सर्वेक्षण, DSR मेकिंग व बायोमॅट्रिक करून घेणे. त्यामध्ये पात्र तसेच अपात्र ही प्रोसेस सुरु केली असल्याचे सांगण्यात आले. तुर्भे येथील शिवाजी नगरमध्ये GBR प्रक्रिया सुरु झाली आहे. 3 C या टप्यापर्यंत पोहचली असून राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शासन निर्णयानुसार मुद्दा क्र. 13 प्रमाणे संबंधितांना आदेश देऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही काळात झोपडीधारकांना आपल्या हक्काचे घर मिळणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Home
Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

बेलापूर मतदारसंघामध्ये अंदाजे 72665 झोपडीधारकांना आपल्या हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. त्याकरिता ज्या काही सूचना किंवा माहिती हवी असेल तर आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच लवकरच भव्य दिव्य असा मेळावा घेऊन पंकज भोयर व संबंधित गृहनिर्माण विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करून मार्गदर्शन करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 2000 च्या आधीच्या झोपडीधारकांना मोफत मालकी हक्क मिळणार आहे. तर सन 2000 ते 2011 नंतरच्या झोपडीधारकांना रक्कम रु. 2,50,000/- रुपये भरून घराचा मालकी हक्क प्राप्त होणार असल्याचे बैठकीत निश्चित झाले.

Home
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

येणाऱ्या काही काळातच बेलापूर विभागामधील रमाबाई आंबेडकर नगर, से-9 (गावस्कर मैदान) सीबीडी, रमाबाई आंबेडकर नगर, से-8, सीबीडी, संभाजी नगर, सीबीडी, जय दुर्गा माता नगर, सीबीडी, निलगिरी गार्डन व नेरूळ विभागातील बोनसरी, माऊली स्टोन, महात्मा गांधी नगर, बोनसरी कॉरी, शिवाजी नगर तसेच तुर्भे येथील आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरा नगर, गणपतीपाडा, सेक्टर – 21,23,24, हनुमान नगर, तुर्भे स्टोर येथील झोपडीधारकांना आपल्या हक्काचा घर मिळणार असल्याने तुर्भे, नेरूळ, बेलापूर येथील झोपडीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Home
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com