Maharashtra Budget 2026: मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा, पण किती रूपयांपर्यंत माफ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्व माहिती

Maharashtra farmers loan waiver 2026: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
Maharashtra Budget 2026: मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा, पण किती रूपयांपर्यंत माफ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्व माहिती
Maharashtra FarmerSaam tv
Published On

Summary -

  • मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची केली घोषणा

  • पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार

  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंची कर्जमाफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंची कर्जमाफी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना सांगितले की, 'आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी आम्ही समिती गठीत केली आहे. राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित परतफेड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल.'

Maharashtra Budget 2026: मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा, पण किती रूपयांपर्यंत माफ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्व माहिती
Maharashtra Budget: तिसरी आणि चौथी मुंबई; नेमकं काय काय करणार ? मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

तसंच, 'कर्जमाफी तसंच प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. यासाठी समितीच्या शिफारसींनुसार दिर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Budget 2026: मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा, पण किती रूपयांपर्यंत माफ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्व माहिती
Maharashtra Budget 2026: लाडक्या बहिणींना ₹२१०० मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, लखपती दीदीवरही मोठा निर्णय, वाचा काय म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com